लाहोर: पाकिस्तानात बॉम्बस्फोट, किमान दोन जणांचा मृत्यू, तर 16 जखमी

फोटो स्रोत, PAkistan rescue team
पाकिस्तानच्या लाहोर शहरातील अनारकली मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान दोन जण ठार तर 16 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक लहान बालक असल्याचे देखील सांगितले जात आहे.
रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की त्यातल्या किमान चार जणांची स्थिती अत्यंत नाजूक आहे.
हा स्फोट इतका मोठा होता की रस्त्यावर अर्धा मीटरचा खड्डा पडला आणि आजूबाजूला असलेल्या इमारतीच्या काचा फुटल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लाहोरचे पोलीस प्रवक्ते राणा आरिफ यांनी सांगितले की "बाईकमध्ये टाइम कंट्रोल बॉम्ब फीट करण्यात आला होता. त्याचाच हा स्फोट झाला आहे."
लाहोरचे डेप्युटी कमिश्नर उमर शेर चठ्ठा यांनी सांगितले की "अनारकली बाजारमध्ये बचावकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."
या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल असं ते म्हणाले.
या घटनेची जबाबदारी बलुचिस्तानातील एका कट्टरतावादी संघटनेनी घेतली आहे.
ही संघटना बहुतेक वेळा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या सरकारी इमारतींना लक्ष्य करते किंवा चीनशी भागीदारी असलेल्या प्रकल्पांना लक्ष्य करते, पण शहरात हल्ला करणे हे या संघटनेनी पहिल्यांदाच केल्याचे म्हटले जात आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)