Austria : चुकीचा पाय कापल्यामुळे डॉक्टरला शिक्षा

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

एका रुग्णाचा चुकीचा पाय कापल्यानंतर ऑस्ट्रियातील एका डॉक्टरला दंड ठोठावण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ही घटना घडली होती.

एका वृद्ध रुग्णाचा डावा पाय काढून टाकण्याऐवजी त्याचा उजवा पाय काढण्यात आला होता. डॉक्टरांची ही चूक दोनच दिवसांनंतर उघडकीस आली होती.

बुधवारी (1 डिसेंबर) लिंझ येथील न्यायालयाने 43 वर्षीय डॉक्टर महिलेला याप्रकरणात गंभीर निष्काळजीपणा केल्यामुळे दोषी ठरवलं आहे आणि तिला 2,296 पौंड (2 लाख 28 हजार रुपये) इतका दंड ठोठावला.

हा खटला न्यायालयात दाखल होण्यापूर्वी मरण पावलेल्या रुग्णाच्या पत्नीलाही 4 लाख 23 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली.

एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हा रुग्ण गेल्या मे महिन्यात फ्रीस्टेट येथील क्लिनिकमध्ये त्याचा पाय कापण्यासाठी गेला होता. पण, डॉक्टरांनी चुकीच्या पायाला चिन्हांकित केलं.

पण, नियमित पट्टी बदलताना ही चूक ओळखली गेली आणि रुग्णाला सांगितलं गेलं होतं की, त्याला त्याचा दुसरा पायदेखील कापून टाकावा लागेल.

ही घटना दुर्दैवी परिस्थितीमुळे उद्भवल्याचं त्यावेळी रुग्णालयानं सांगितलं होतं. रुग्णालयाच्या संचालकानं पत्रकार परिषदेत जाहीर माफी मागितली होती.

डॉक्टरनं कोर्टात सांगितलं की, ऑपरेशन थिएटरमध्ये देण्यात आलेल्या सूचनांच्या क्रमात चूक झाली होती.

डाव्या पायाऐवजी उजवा पाय का चिन्हांकित केला असं विचारण्यात आल्यानंतर डॉक्टर महिला केवळ एवढंच म्हणाली की, "मला माहिती नाही."

या घटनेनंतर महिला डॉक्टर दुसऱ्या दवाखान्यात ऋजू झाली आहे. तिच्यावर आकारण्यात आलेल्या दंडाची निम्मी रक्कम कमी करण्यात आली आहे.

अशी प्रकरणे दुर्मिळ आहेत पण, यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

आपण मधुमेहाच्या रुग्णाचा चुकीचा पाय कापत आहोत, असं 1995मध्ये अमेरिकेतील एका डॉक्टरला शस्त्रक्रिया अर्ध्यावर आली असताना लक्षात आलं होतं. स्नायू आणि इतर भाग कापल्यानंतर त्याला ती प्रक्रिया समोर नेण्याशिवाय पर्याय नव्हता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)