इस्रायलमध्ये भारतीय हवाई दलाचं 'मिराज' विमान नेमकं काय करत आहे?

फोटो स्रोत, @DrSJaishankar
इस्रायल देश सध्या 'ब्लू फ्लॅग 2021' नावाचा मल्टीनॅशनल एअर एक्सरसाइज म्हणजेच हवाई सराव करत आहे. हा आजवरचा इस्रायलमधील सर्वात मोठा लष्करी सराव असल्याचं सांगितलं जातंय.
दर दोन वर्षांनी या सरावाचं आयोजनं केलं जातं. विविध राष्ट्रांबरोबरचे संबंध दृढ व्हावे, हा त्यामागचा उद्देश असतो, असं इस्रायलच्या हवाई दलाच्या वतीनं सांगण्यात आलं.
यावर्षी होणारा सराव सर्वात अत्याधुनिक आणि मोठा आहे. या मल्टीनॅशनल एअर एक्सरसाइजमध्ये, सात देशांच्या हवाई दलांची पथकं सहभागी झाली आहेत.
28 ऑक्टोबरपर्यंत हा सराव सुरू राहणार आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या सरावामध्ये जर्मनी, इटली, ब्रिटन, फ्रान्स, भारत, ग्रीस आणि अमेरिकेच्या हवाई दलांचा सहभाग आहे. या देशांच्या चौथ्या आणि पाचव्या पिढीतील विमानं यात सहभागी होत आहेत.
इस्रायलच्या पाच दिवसीय दौऱ्यावर गेलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी (19 ऑक्टोबर) ओव्हडा एअरबेसवर होत असलेल्या ब्लू फ्लॅग इंटरनॅशनल एअर फोर्स एक्सरसाइजची पाहणी केली. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाचच्या पथकाबरोबर फोटोही काढले.
त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. 'भारतीय आणि इस्रायली हवाई दल यांच्यात आपसांत सन्मान आणि संबंध पाहून आनंद झाला. संरक्षण हा आपल्या संबंधांचा मुख्य आधार आहे,' असं ते ट्विटमध्ये म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
इस्रायलमधील भारताचे राजदूत नौर गिलोन यांनीही ट्वीट करून भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी एअरबेसचा दौरा केल्याची माहिती दिली होती.
वायुसेनेचा सराव का महत्त्वाचा?
इस्रायलनं हा त्यांचा आतापर्यंतचा हवाई दलाचा सर्वात मोठा सराव असल्याचं म्हटलं आहे. त्यात त्यांच्याशिवाय इतर आणखी सात देशांच्या हवाई दलांची लष्करं सहभागी होत आहेत.
इसरायलमधीलल 'हारेत्झ' या वृत्तपत्रानुसार, दर दोन वर्षांनी होणारा हा सराव कुटनितीचा भाग असल्याचं 2017 मध्ये इस्रायलच्या हवाई दलाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं होतं.
अनेक देश हे अरब राष्ट्रांची काळजी आणि पॅलेस्टाईनसारके मुद्दे बाजुला ठेवून इस्रायलबरोबर भागीदारी करू इच्छितात, हे यावरून स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले होते.

फोटो स्रोत, Tomer Aizik/IAF
या सरावामुळं सहभागी होणाऱ्या हवाई दलांच्या क्षमतेतही वाढ होते. यात हवेतून हवेमध्ये आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं.
त्याशिवाय या सरावात शत्रूच्या हद्दीत त्यांनी तयार केलेलेया एअर डिफेन्स सिस्टीमपासून संरक्षण आणि इतरही वेगवेगळ्या कारवायांच्या सरावाचा समावेश आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
'इस्रायलच्या स्थापनेनंतर प्रथमच ब्रिटिश हवाई दलाचं पथक याठिकाणी आलं आहे. तसंच प्रथमच भारतीय हवाई दलाचं मिराज विमान इस्रायलमध्ये आलं आहे. शिवाय फ्रान्सच्या हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानाची तुकडीही प्रथमच आली आहे,' अशी माहिती इस्रायलच्या एअरफोर्सनं दिली आहे.
इस्रायलच्या हवाई दलानं आणखी काय म्हटलं?
इस्रायलच्या हवाई दलाचे कमांडर आणि मेजर जनरल अमिकम नॉर्किन यांनी अशा प्रकारचा सराव होणं हे, दोन देशांमधील संबंधांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं म्हटलं आहे.
"आम्ही अत्यंत कठीण परिसरात राहत आहोत. याठिकाणी इस्रायलला गाझा पट्टी, लेबनान, सिरिया आणि इराणचा धोका असून, तो सातत्यानं वाढत आहे," असं ते म्हणाले.
"अशा प्रकारच्या स्थितीमध्ये असा आंतरराष्ट्रीय सराव करणं आणि सर्व पातळ्यांवर यश मिळणं, याचं सामरिकदृष्ट्या मोठं महत्त्वं आहे. त्याचबरोबर या सरावाचा इस्रायलच्या हवाई दल, लष्कर आणि देशावर व्यापक परिणाम होईल," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Tomer Aizik/IAF
सध्या सुरू असलेला सराव हा विभागीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल आहे, असंही मेजर जनरल नॉर्किन म्हणाले.
'हा सराव तंत्र, प्रशिक्षणाचा दर्जा आणि सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या संख्येचा विचार करता अभूतपूर्व असा आहे. यावरून सर्व देशांच्या हवाई दलांमध्ये दृढ संबंध असल्याचं स्पष्ट होतं,' असंही नॉर्किन म्हणाले.
रविवारी (17 ऑक्टोबर) या सरावाच्या पहिल्या दिवशी नॉर्किन यांनी जर्मनीचे लेफ्टनंट जनरल इंगो गेरहार्ट्झ यांच्यासह येरुसलेमच्या वरून प्रवास करणाऱ्या इस्रायल आणि जर्मन विमानांचं नेतृत्व केलं होतं. तसंच दोन्ही अधिकारी वाशेम होलोकॉस्ट मेमोरियल सेंटरमध्येही गेले होते. त्याठिकाणी त्यांनी नरसंहारातील पीडितांना श्रद्धांजलीही अर्पण केली होती.
नॉर्किन यांनी 'बाज' (एफ-15) विमानाचं नेतृत्व केलं, तर गेरहार्ट्झ यांनी 'ईगल स्टार' युरोफायटरचं उड्डाण केलं. याचं वैशिष्ट्य म्हणजे. यावर इस्रायल आणि जर्मनीचे झेंडे होते.

फोटो स्रोत, Tomer Aizik/IAF
इस्रायलचे लष्करप्रमुख अविव कोचावी यांनी मंगळवारी गेरहार्ट्झ यांना मेडल ऑफ अॅप्रिसिएशननं गौरवलं होतं. हा सन्मान त्यांना इस्रायल आणि जर्मन सुरक्षा दलांदरम्यान जवळचे संबंधं प्रस्थापित होण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी देण्यात आला.
जर्मनीतील इस्रायलचे राजदूत सुझेन वासूम-गाइनर यांनी नॉर्किन यांना जर्मनीतील सर्वात मोठा राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीनं गौरवलं.
'इस्रायल आणि जर्मन विमानं एकत्रितरित्या आजच्या काळातील सर्वात मोठ्या आव्हानांसाठी सज्ज होत आहेत,' असं एका सोहळ्यात वासुम-गाइनर यांनी म्हटलं.
"गेल्यावर्षी इसरायलच्या विमानांनी जर्मनीच्या हवाई दलाच्या सरावात सहभागी होणं, हादेखील आणखी एक महत्त्वाचा निर्णय होता. त्यामुळं आमच्या सैनिकांमध्ये व्यावसायिक आणि मैत्रिपूर्ण संबंध वाढत असल्याचं पाहायला मिळालं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)