Covid Toe : कोरोनामुळे काही लोकांना पायाच्या बोटाजवळ चट्टे का येत आहेत?

फोटो स्रोत, Chris Curry/Getty
- Author, आरोग्य संपादक
- Role, बीबीसी न्यूज ऑनलाइन
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही लोकांच्या पायाच्या बोटांना, अंगठ्याला सूज तसेच लाल चट्टे दिसून येत आहेत. याचं कारण शोधता येऊ शकतं असं संशोधकांना वाटतं.
शरीरात घुसलेल्या विषाणूविरोधात लढण्यासाठी शरीर एकदम तयारीनिशी उतरल्यामुळे अशा प्रकारचे परिणाम दिसत आहेत. याला 'कोव्हिड टो' (Covid Toe) असं म्हणतात.
अशाप्रकारची स्थिती तयार झाल्यावर काय करायचे याचा एक निबंध ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मेटॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे कोव्हिड टोची लक्षणं ओळखून उपचार करणं सोपं जाईल.
'कोव्हिड टो' म्हणजे काय?
ही स्थिती कोणत्याही वयाच्या व्यक्तीमध्ये दिसू शकते. पण विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये ती दिसून येते. काहीवेळेस त्यामुळे वेदना होत नाहीत. पण पुरळ आल्यावर त्याला खाज येते, फोड येतात आणि तो भाग सुजतो.
स्कॉटलंडमधील क्लॅकमॅनशायरमध्ये राहाणाऱ्या सोफिया या 13 वर्षांच्या मुलीला कोव्हिड टो झाल्यानंतर चालताही येत नव्हतं. संपूर्ण उन्हाळा तिला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.
बोटांजवळ अशा प्रकारे चट्टे दिसून ते लाल किंवा जांभळे झाले होतात. काही लोकांना फोड येतात. तसेच त्यामध्ये काही पू होऊ शकतो. काही आठवडे किंवा काही महिने हे चट्टे राहातात.
हे चट्टे का येतात?
रक्त आणि त्वचेच्या तपासणीवरुन एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. प्रतिकारक्षमतेचे दोन भाग असतात. कोरोना विषाणूविरोधात ते दोन्ही लढत असतात. एक भाग असतो अँटिव्हायरल प्रोटिन, त्याला टाइप-1 इंटरफेरॉन असं नाव आहे.
तर दुसरा भाग म्हणजे अँटिबॉडी म्हणजे प्रतिपिंडं. हे दोघेही विषाणूविरोधात लढताना चुकून व्यक्तीच्या स्वसतःच्या पेशी आणि उतींवरच हल्ला करतात.

फोटो स्रोत, COVID-piel study
पॅरिस विद्यापीठात हा अभ्यास करण्यात आला. 2020मध्ये कोव्हिड टो ची लक्षणं असणाऱ्या 50 रुग्णांचा संशोधकांनी यात अभ्यास केला.
त्यांच्यामध्ये अशी पुरळ, चट्टे अशी लक्षणं होती, मात्र त्यांच्यात कोरोनाची इतर लक्षणं नव्हती कारण हे चट्टे कोरोनाची साथ येण्यापूर्वी दिसून आले होते. या नव्या अभ्यासामुळे रुग्ण आणि डॉक्टरांना या स्थितीत काय करायचे ते समजेल असं संशोधकांना वाटकं.
इंग्लंडमधील डॉ. इव्हान ब्रिस्टो सांगतात, बहुतांशवेळा हे चट्टे आपोआप जातात. पण काही लोकांना मलम किंवा औषधांची गरज पडते. एकदा त्याचं कारण समजलं की नवे उपचार अधिक चांगल्या प्रभावीपणे काम करण्यासाठी विकसित करता येईल.
डॉ. वेरोनिक बाटेअल सांगतात, साथीच्या पहिल्या टप्प्यात कोव्हिड टो मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. पण सध्याच्या डेल्टा व्हेरिअंटमध्ये तो कमी प्रमाणात दिसून आला आहे. आधीच्या संसर्गामुळे किंवा सध्या होत असलेल्या लसीकरमामुळे त्याचं प्रमाण घटलं होतं. लसीकरणानंतर त्याचं प्रमाण फारच कमी आहे.
दीर्घकाळ संसर्गामुळे तसेच इतर कोणतीही लक्षणं नसणाऱ्या लोकांमध्ये कोव्हिड संदर्भातील त्वचेच्या समस्या दिसू शकतात मात्र त्याचा कोरोना विषाणूशी असलेला संबंध प्रस्थापित झालेला नाही.
ब्रिटिश असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजिस्टने कोव्हिडशी संबंध असू शकणाऱ्या त्वचेच्या समस्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























