प्रियांका चोप्राने अमेरिकन जनतेची माफी मागितली, कारण...

प्रियंका चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रियंका चोप्रा
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी अमेरिकन अॅक्टिव्हिजम (सामाजिक कार्यकर्त्यांवर आधारित) रियलिटी शो 'द अॅक्टिव्हिस्ट' मधील जज म्हणून सहभागाबद्दल माफी मागितली आहे. हा शो चुकीच्या दिशेला गेल्याची चूक झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

'द अॅक्टिव्हिस्ट' हा शो आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा शो आहे, जे जी-20 देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात.

या शोच्या फॉरमॅटच्या मुद्द्यावरून निर्मात्यांनीही माफी मागितली आहे.

जेव्हा या शोबाबत घोषणा झाली होती, त्याचवेळी सोशल मीडियावर या शोला प्रचंड विरोध झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या शोच्या विरोधात उठलेले आवाज माझ्यापर्यंत पोहोचले, असं प्रियांका चोप्रा यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर प्रियांका यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी "गेल्या आठवडाभरापासून तुमच्या विरोधाच्या आवाजानं मी प्रभावित झाले आहे. शोची चूक झाली असून, यात मी सहभागी झाल्यामुळे मी आपल्यापैकी अनेकांना दुःख पोहोचवलं आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

"या शोचा उद्देश प्रकाशझोतात न येता, सातत्याने न थकता इतरांसाठी विविध विचारांनी काम करत राहणाऱ्यांना समोर आणणं हा होता. त्यांचं काम आणि त्यांचा परिणाम याबाबत लोकांना माहिती देणं हा होता," असं त्यांनी लिहिलं.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

समाजात विविध मुद्द्यांवर काम करणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा घडवून आणणं आणि त्यामाध्यमातून जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मुद्द्यांचं महत्त्व कमी करून ते टीव्हीवर सादर करणं, असा या शोचा फॉरमॅट असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात होती.

या शोचं शूटिंग पूर्ण झालं आहे. मात्र आता हा शो माहितीपटाच्या रुपानं सादर केला जाणार आहे. या शोमध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता, त्यांचाच समावेश या माहितीपटामध्ये असेल.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

'आम्ही कार्यकर्त्यांची माफी मागतो'

अमेरिकन टीव्ही नेटवर्क सीबीएस आणि शोचे निर्माते लाइव्ह नेशन तसंच ग्लोबल सिटिझन यांनी एकत्रितरित्या त्यांचं म्हणणं मांडलं आहे. शोचा फॉरमॅट कार्यकर्त्यांना "त्यांच्या कामापासून परावृत्त" करत असल्याचं त्यांनी मान्य केलं.

"सामाजिक कार्य हे जागतिक स्तरावर एकमेकांबरोबरच्या स्पर्धेवर अवलंबून नसून, सहकार्य आणि सहभाग यावर अवलंबून आहे. आम्ही शोमधील कार्यकर्ते, कार्यक्रमाचे सादरकर्ते आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या समुदायाची माफी मागतो. आम्ही मुद्दे समजण्यातच चूक केली," असं ग्लोबल सिटिझननं म्हटलं आहे.

प्रियंका चोप्रा आणि अशर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रियंका चोप्रा आणि अशर

"जगात बदल घडवून आणण्यासाठी या व्यासपीठाचा वापर सर्वांत प्रभावी पद्धतीनं करून एखाद्या मुद्द्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रेरक कथा जगापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे."

"शोच्या ज्या फॉरमॅटची घोषणा झाली होती, तो कार्यकर्त्यांना त्यांच्या कामापासून परावृत्त करणारा होता, हे स्पष्ट आहे. जागतिक बदलासाठीचे प्रयत्न हे स्पर्धेच्या माध्यमातून करता कामा नये. तर त्यासाठी जागतिक स्तरावर ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा," असं ग्लोबल सिटिझन, सीबीएस आणि लाइव्ह नेशननं म्हटलं.

'निरपेक्ष भावनेने काम करतात कार्यकर्ते'

"संपूर्ण जगात कार्यकर्ते आणि अशा प्रकारे काम करणारे लोक हे रोज न थकता काम करतात. त्यांना स्वतःचं नाव होण्याची किंवा इतर कशाचीही अपेक्षा नसते, ते लोकांच्या, समाजाच्या आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी काम करतात," असंही या वक्तव्यात म्हटलं आहे.

"त्या सगळ्यांचं काम जगासमोर आणून, लोकांना त्यांच्या कामाशी जोडले जाण्याची प्रेरणा देण्यात आम्ही यशस्वी होऊ, अशी आम्हाला आशा आहे."

गेल्या आठवड्यामध्ये या शोची घोषणा करण्यात आली होती. या शोमध्ये परिक्षक म्हणून प्रियांका चोप्रासह अशर आणि ज्युलियन हो सहभागी आहेत.

या शोबाबत माहिती समोर आल्यापासून सोशल मीडियावर याचा विरोध सुरू होता. शोची तुलना 'द हंगर गेम्स' आणि 'ब्लॅक मिरर' सारख्या चित्रपटांशी केली जाऊ लागली होती.

त्यानंतर ज्युलियन हो यांनी इन्स्टाग्रामवर शोबाबत पोस्ट केली होती. शोचा परिणाम ज्या पद्धतीचा अपेक्षित होता तसा होऊ शकला नाही, असं त्यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)