लघुग्रह आदळल्यामुळे डायनासोरचा नायनाट, पण सापांची भरभराट

    • Author, हेलेन ब्रिग्ज
    • Role, विज्ञान आणि पर्यावरण प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पृथ्वीवर सापांची संख्या वाढण्याला लघुग्रह आदळणं हे सुद्धा कारण आहे.

यासंदर्भात एक नव्याने अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यामुळे डायनासोर नष्ट झाले होते.

त्यामुळे पृथ्वीवरील अनेक वृक्ष, जनावरं नष्ट झाले होते. मात्र शास्त्रज्ञांच्या मते या घटनेमधून सापांच्या काही प्रजाती वाचल्या होत्या.

हे साप जमिनीखाली लपून राहिले आणि अन्नाविना दीर्घकाळ जिवंत राहाण्यात यशस्वी झाले.

डायनासोर नष्ट झाले

हे साप जगभरात पसरले आणि आज त्यांच्या तीन हजारपेक्षा जास्त प्रजाती आहेत.

लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची घटना 60 लाख वर्षं जुनी आहे. त्यामध्येच डायनासोर नष्ट झाले होते.

लघुग्रह आदळळ्यामुळे भूकंप, त्सुनामी, वणव्यासारखी संकटं आली असं शास्त्रज्ञ सांगतात. यामुळे तयार झालेल्या राखेच्या ढगामुळे सुमारे दशकभर पृथ्वीवर अंधार होता, सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत येऊच शकत नव्हती.

या घटनेत पृथ्वीवरील 76 टक्के झाडं आणि प्राणी नष्ट झाले असं शास्त्रज्ञ सांगतात.

शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन

काही साप, काही सस्तन प्राणी, पक्षी, काही माशांनी या घटनेतून स्वतःला वाचवलं.

बाथ विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी काम केलं आहे.

संशोधकांच्या चमूचे प्रमुख डॉक्टर कॅथरिन क्लीन म्हणाल्या, "जेव्हा पृथ्वीवर आहार-श्रृंखलेचं चक्र तुटल्यावर सापच वाढण्यात यश मिळवू शकले. त्यांनी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यात विलंब केला नाही."

"असा कोणता उपग्रह धडकला नसता तर आजची सापांची स्थिती वेगळी असती."

हा उपग्रह पृथ्वीवर मेक्सिकोजवळ आदळला होता. हे साप आज दिसतात तसेच होते. पाय नसलेले, लवचिक जबडा असलेले आणि सहज शिकार गिळू शकतील असेच ते होते.

सापांच्या प्रजाती

साप काही न खाता-पिता वर्षभर राहू शकतात. उपग्रह आदळल्यावर जी हानी झाली त्यातही जिवंत राहाण्यासाठी सापांना त्यांचा हा गुण उपयोगी पडला.

या प्रजाती जमिनीच्या खाली किंवा झाडांच्या खाली तसेच स्वच्छ पाण्यामध्ये राहाणाऱ्या होत्या. इतर प्राण्यांशी स्पर्धा त्यांना फार कमी प्रमाणात करावी लागली.

आपली संख्या वाढवण्यासाठी त्यांना मोकळं मैदानच मिळालं आणि ते जगभर पसरले. त्याच काळात साप आशिया खंडात आले.

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन

बदलत्या काळानुसार सापांचा आकार मोठा होत गेला, त्यांचं क्षेत्रही वाढत गेलं. ते रहिवासी प्रदेशात येऊ लागले, नव्या भक्ष्यांना शोधू लागले.

सापांच्या नव्या प्रजाती अस्तित्वात आल्या. यामध्ये 10 मीटर लांबीचे समुद्री सापही होते.

कॅथरिन क्लिन यांचं हे संशोधन नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रसिद्ध झालं आहे. आता जगात ज्या सापांच्या प्रजाती आहेत, त्यांच्यावर कधीनाकधी तरी लघुग्रह आदळण्याचा परिणाम झालेला आहे, असं या संशोधनात म्हटलं आहे.

सर्वत्र आढळतात साप

साप आज जगभरात सर्वत्र आढळतात. त्यात झाडांवर राहाणारे, समुद्रात राहाणारे, विषारी, अजगर अशा अनेक प्रजातींचा समावेश आहे.

एखाद्या प्राण्याच्या अर्ध्या प्रजाती नष्ट होण्याच्या घटना पृथ्वीच्या इतिहासात अत्यंत कमी आहेत.

अंटार्क्टिका सोडल्यास पृथ्वीवर सर्वत्र साप आढळतात. वाळवंट, समुद्र, झाडं, जमिनीखाली सर्वत्र सापांनी राहाण्यासाठी जागा तयार केल्या आहेत.

काही सेंटीमीटर्सपासून सहा मीटर पर्यंत सापांची लांबी असते. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी साप आवश्यक आहेत.

किडे, उंदीर खाऊन ते माणसाला मदत करतात. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे सापांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)