तालिबान : अमेरिका अफगाणिस्तानात काय काय सोडून गेली?

तालिबान

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, तालिबान संघटनेतील लोक
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेच्या लष्करानं अफगाणिस्तान सोडलं आहे. मात्र काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेचं लष्कर काही लष्करी उपकरणं तशीच सोडून गेलं आहे. या उपकरणांबरोबर तालिबानचे काही फोटो समोर आले आहेत.

अमेरिकेच्या सैनिकांना 31 ऑगस्टच्या मुदतीपूर्वी अफगाणिस्तान सोडायचं होतं. त्यामुळे त्यांनी 75 विमानं, जवळपास 100 गाड्या आणि इतर उपकरणं विमानतळावरच तशीच बेवारस सोडून दिली.

पण ही विमानं, गाड्या किंवा इतर उपकरणं निकामी केली असून तालिबानला ती वापरता येणं अशक्य असल्याचं अमेरिकेचे सेंट्रल कमांड प्रमुख केनेथ मॅकेंझी यांनी स्पष्ट केलं आहे.

"ती विमानं पुन्हा कधीही उड्डाण घेऊ शकणार नाहीत," असं ते म्हणाले..

विमानतळावरील उपकरणांत खालील विमानांचा समावेश आहे :

1) टेहळणी आणि जवळून हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे MD-530 हेलिकॉप्टर्स

2) A-29 लाईट विमानं

3) अफगाणिस्तान लष्कराला अमेरिकेनं पुरवलेली 43 MD-530s आणि 23 A-29s हेलिकॉप्टर्स

अमेरिका विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेची विमानं

प्रत्येक उपकरण किंवा विमानाच्या किंमतीचा अंदाज लावणं शक्य नाही. मात्र केवळ A-29 या विमानांचीच किंमत अंदाजे 1 कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

लॉस एंजलिस टाईम्सचे प्रतिनिधी नबी बुलोस यांनी शूट केलेल्या व्हीडिओमध्ये तालिबानचे लोक CH-46 सी नाईट या मालवाहू हेलिकॉप्टर्सबरोबर दिसून आलेत.

काबूलमधील दुतावासातून अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी या 7 सी नाईट्स हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. पण त्यानंतर ती निकामी करून तिथंच सोडून देण्यात आली आहेत.

तसंच या सर्वांबरोबरच किमान एक C-130 हर्क्युलस मालवाहू विमानदेखील आढळून आलं आहे.

याशिवाय 70 लष्करी वाहनं (MRAPs-माईन रेझिस्टंट अँब्युश प्रोटेक्टेड व्हेईकल्स) देखील निरुपयोगी करून तिथंच सोडण्यात आल्याचंही जनरल मॅकेंझी यांनी सांगितलं.

तालिबानी सैनिक MD-530 चे फोटो घेताना...

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तालिबानी सैनिक MD-530 चे फोटो घेताना...

या एका वाहनाची किंमत जवळपास 5 ते 10 लाख अमेरिकन डॉलर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याबरोबरच खालील उपकरणंही काबूलमध्ये सोडून देण्यात आली :

सर्व प्रकारच्या भूभागावर चालणारी 27 हम्वी वाहनं

काऊंटर रॉकेट आणि आर्टिलरी डिफेन्स सिस्टीम उपकरणं (संख्या अनिश्चित)

यापैकी काही उपकरणं निकामी करण्यासाठी तर स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

देशाच्या इतर भागात मात्र अफगाणिस्तानच्या लष्करानं पळून जाण्यापूर्वी उपकरणं निकामी करण्यासाठी फार कष्ट घेतले नाहीत.

मात्र अफगाणिस्तानचं सरकार कोसळण्यापूर्वी काही विमानं देशाबाहेर उझबेकिस्तानला पाठवण्यात आल्याचं सॅटेलाईट ईमेजवरून पाहायला मिळत आहे.

हमीद करझाई एअरपोर्टवरील C-130 हे विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हमीद करझाई एअरपोर्टवरील C-130 हे विमान

प्रशिक्षित पायलट, सुट्या भागांची उपलब्धता आणि देखभाल याचा विचार करता तालिबानला यांचा वापर करता येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मात्र जूनच्या अखेरीपर्यंत अफगाणिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात असलेल्या 33 UH-60 हॉक ब्लॅक हेलिकॉप्टर्ससह 167 विमानांपैकी बहुतांश ही आता तालिबानच्या ताब्यात असण्याची शक्यता आहे. त्याचा नेमका आकडा मात्र सांगता येऊ शकत नाही.

तालिबान तर अमेरिकेची उपकरणं वापरत असल्याचं आधीपासूनच स्पष्टपणे दिसून आलं आहे.

तालिबानच्या विशेष तुकड्यांचे सदस्य काबूलमध्ये M4 रायफल्स घेऊन असल्याचे फोटोही समोर आले आहेत.

डिसेंबर 2017 ते एप्रिल 2020 याकाळात अफगाणिस्तानच्या लष्कराला किमान 3598 M4 कार्बाईन पुरवण्यात आल्या.

त्याचबरोबर अमेरिकेनं डिसेंबर 2017 ते एप्रिल 2020 या काळात सुमारे 2500 पेक्षा अधिक हम्वी वाहनांचा पुरवठा केल्याचंही अफगाणिस्तान पुनर्वसनासाठीचे अमेरिकेच्या विशेष महारनिरीक्षकांनी सांगितलं.

याची नेमकी किंमत स्पष्ट नाही, मात्र त्याची एकूण अंदाजे रक्कम 2,50,000 अमेरिकन डॉलर एवढी असल्याची शक्यता आहे.

इतर उपकरणंही तालिबानच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरू शकतात. त्यात नाईट व्हीजन गॉगलचा समावेश आहे. अशा प्रकारचे 16 हजार गॉगल अफगाणिस्तानच्या लष्कराला 2003 ते 2021 दरम्यान पुरवण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)