तालिबाननं म्हणतं, 'अमेरिकेची माघार हा जगासाठी एक धडा आहे'

फोटो स्रोत, Reuters
तालिबाननं मंगळवारी (31 ऑगस्ट) म्हटलं की, अमेरिकेची माघार ही इतर आक्रमकांसाठी आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक धडा आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी काबुल विमानतळावरून शेवटचं अमेरिकन विमान गेल्यानंतर काही वेळातच हामिद करझाई इंटरनॅशनल एअरपोरटच्या रनवेवरून म्हटलं, "सगळ्या जगानंही यातून एक धडा घ्यायला हवा."
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी म्हटलं की, अफगानिस्तानचं अभिनंदन...हा विजय आपल्या सर्वांचा आहे.
लॉस एंजलिस टाइम्सचे प्रतिनिधी नबीह बुलास तालिबानच्या टीमसोबत एअरपोर्टवर गेले होते. ही टीम एअरपोर्टच्या हँगरची तपासणी करण्यासाठी गेली होती.
अमेरिकन सैन्यानं तिथं आपली काही विमानं सोडली असल्याची शक्यता होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नबीह बुलोस व्हीडिओमध्ये म्हणत आहेत की, आम्ही इथं तालिबानसोबत आहोत. ते काही वेळापूर्वीच काबूल एअरपोर्टवर अमेरिकेच्या नियंत्रणाखालील भागात दाखल झाले आहेत. त्यांनी आता इथं पूर्ण नियंत्रण मिळवलंय.
लष्करी विमानं काबूल विमानतळावरच सोडून अमेरिकेचे सैन्य परतले?
अफगाणिस्तान सोडत असताना अमेरिकेच्या लष्कराने काबूल विमानतळावर असलेली आपली विमानं आणि लष्करी गाड्या निकामी केल्या आहेत. तालिबान वापर करु नये म्हणून असं केल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं.
अमेरिकेच्या मध्यदलाचे प्रमुख जनरल केनेथ मेकंझी यांनी सांगितलं की, त्यांच्या सैनिकांनी 73 एअरक्राफ्ट, 70 बख्तरबंद गाड्या आणि 27 हम्वी वाहनं निष्क्रिय केली आहेत.
ही एअरक्राफ्ट्स पुन्हा कधीही उड्डाण घेऊ शकणार नाही. तसंच ती कोणालाही वापरताही येणार नाहीत.
अमेरीकेच्या लष्कराने काबूल सोडल्यानंतर अमेरिकेचे वृत्तपत्र लॉस एंजल्स टाइम्सच्या एका रिपोर्टरने विमानतळाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमधील दृश्यांमध्ये तालिबानी विमानतळावरील अमेरिकन विमानांचा आढावा घेताना दिसत आहेत.
काबूल विमानतळावर सोडताना अमेरिकेने आपल्या अत्याधुनिक रॉकेट डिफेंस सिस्टमला सुद्धा निष्क्रिय केलं आहे. याच सी-रॅम तंत्रज्ञानाच्या आधारे अमेरिकेच्या लष्कराने सोमवारी (30 ऑगस्ट) इस्लामिक स्टेटच्या एका रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं.
याआधी काही आठवड्यांपूर्वी असे अनेक रिपोर्ट्स समोर आले ज्यानुसार, तालिबानसाठी लढणाऱ्यांच्या हातात अमेरिकन शस्त्र आणि वाहनं दिसून आली.
खरं तर अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानच्या सैन्याकडे ही शस्त्र आणि वाहनं दिली होती. पण त्यांनी आत्मसमर्पण केल्याने आता ते तालिबानच्या हातात आहेत.
अमेरिकेची माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण
अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती सोमवारी (30 ऑगस्ट) पेंटागॉनने दिली. हजारो अमेरिकन लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
तब्बल वीस वर्षांच्या संघर्षानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानची भूमी सोडली आहे.
तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत अमेरिकेच्या या माघारीचा आनंद साजरा केला.
अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 31 ऑगस्ट ही कालमर्यादा निश्चित केली होती. या तारखेच्या एक दिवस आधीच अमेरिकेनं आपली बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचं जाहीर केलं.
गेल्या महिन्याभरात तालिबानने केलेली आगेकूच आणि नंतर काबुलचा घेतलेला ताबा या पार्श्वभूमीवर जो बायडन यांच्या घाईघाईने बाहेर पडण्याच्या निर्णयावर डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन दोघांनी टीका केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी दिली. अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील राजनयिक अधिकारी रोस विल्सन हे C-17 या विमानातून परतणारे शेवटचे व्यक्ती होते, असंही मॅकेन्झी यांनी सांगितलं.
ऑगस्ट 14 पासून काबुलमधून जवळपास 1 लाख 22 हजारांहून अधिक लोकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढण्यात आलं आहे, ज्यामध्ये सहा हजार अमेरिकेन नागरिकांचाही समावेश होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये आलेल्या फौजांनी तालिबानला सत्तेवरून हटवलं होतं, त्यानंतर वीस वर्षांनी तालिबानने पुन्हा पूर्ण देशाचा ताबा घेण्यात यश मिळवलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)