तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : काबूलमधून लोकांना बाहेर काढताना जीवाला धोका होऊ शकतो - जो बायडन

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

तालिबान या कट्टरतावादी संघटनेमुळे अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नागरिकांना बाहेर काढताना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती बायडन यांनी यावेळी व्यक्त केली.

व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना बायडन म्हणाले, "अमेरिकेने अफगाणिस्तानातून आतापर्यंत 13 हजार लोकांना बाहेर काढलं आहे. ही जगातील सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकच्या सैनिकांसोबतच त्यांची मदत करणाऱ्या 50 ते 65 हजार अफगाण नागरिकांनाही बाहेर काढलं जाईल", असं बायडन म्हणाले.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य मागे बोलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयावर जगभरातून टीका होताना दिसते.

अमेरिकेच्या कोणत्याही नागरिकाला देशात परतायचं असल्यास आम्ही त्याला परत आणण्यास तयार आहोत, असं बायडन यांनी म्हटलं.

अफगाणिस्तानातून केवळ अमेरिकचं सैन्यच नव्हे तर काही अफगाण नागरिकांनाही बाहेर काढलं जाईल, पण सर्वाधिक प्राधान्य अमेरिकच्या नागरिकांनाच असेल, असंही बायडन म्हणाले.

ही मोहीम धोकादायक

लोकांना बाहेर काढताना आम्हाला कोणतीही चूक करायची नाही. ही मोहीम धोकादायक आहे. आमच्या सुरक्षा बलावर टांगती तलवार आहे. हे सगळं काम कठीण परिस्थितीत केलं जात आहे, असंही बायडन यांनी म्हटलं.

या मोहिमेअखेरीस कुणाचंही नुकसान होईल किंवा होणार नाही, याबाबत मी तुम्हाला वचन देऊ शकत नाही. पण देशाचा प्रमुख या नात्याने मी शक्त ते सगळे प्रयत्न करीन, हा विश्वास मी तुम्हाला देतो.

तालिबान

फोटो स्रोत, EPA

अमेरिकच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी फौजा पाठवण्याची गरज भासणार नाही. अमेरिकेचा पासपोर्ट असलेल्या नागरिकांना विमानतळावर जाण्यासाठी तालिबानकडून परवानगी दिली जात आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, काही नागरिकांना काबूल विमानळापर्यंत पोहोचण्यासही अडचणी येत आहेत, असं वृत्त आहे.

पोर्टलिकोच्या एका बातमीननुसार, अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या काही अमेरिकच्या नागरिकांवर तालिबानकडून मारहाण झाली, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दिली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)