पाकिस्तान रेल्वे अपघात : आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जण जखमी

फोटो स्रोत, ISPR
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील डहरकीजवळ सर सैय्यद एक्स्प्रेस आणि मिल्लत एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या आहेत.
या दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे ,तर 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
रेडियो पाकिस्तानानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (7 जून) पहाटे ही घटना घडली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे तर रेल्वेच्या डब्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
रेल्वेच्या माहितीनुसार, मिल्लत एक्सप्रेस कराचीहून सरगोधा आणि सैय्यद एक्सप्रेस रावळपिंडीहून कराचीला जात होती.

फोटो स्रोत, Getty Images
दुर्घटनेनंतर मिल्लत एक्सप्रेसचे 8 आणि सर सैयद एक्सप्रेसचे इंजीनसहित तीन डब्बे पटरीहून खाली उतरले. तर काही डबे दरीत पडले.
घोटकी भागातल्या डहरकी जवळ ही घटना घडली असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करत म्हटलं, घोटकी इथं झालेल्या घटनेमुळे मला हादरा बसरला आहे. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना निर्देश दिले आहेत. याप्रकरणी रेल्वे सुरक्षेतील दोष शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
घोटकीचे उपआयुक्त उस्मान अब्दुल्लाह यांनी जियो न्यूजला सांगितलं की, मदतकार्यासाठी मोठमोठ्या मशीन्सची गरज आहे आणि त्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
'अत्यंत हृदयद्रावक घटना'
अब्दुल रहमान फैसलाबादहून रात्री 8 वाजता सय्यद अहमद एक्स्प्रेसमध्ये बसले होते. त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रियाज सुहैल यांना सांगितलं की, "ट्रेन प्रति तास 100 किमीहून अधिक वेगानं धावत होती. मी जागा होतो. 3 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान मोठे धक्के बसायला लागले, चालकानं ट्रेनला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रेन समोरील ट्रेनला धडकली."

फोटो स्रोत, majid sungher
मिल्लत एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून उतरून दुसऱ्या रुळावर गेले होते आणि ट्रेन आपोआप पुढे जात होती, असंही ते सांगतात.
"त्यावेळी काळोख होता. दुर्घटनेनंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचू लागले. त्यांनी दुचाकी आणि मोबाईलच्या प्रकाशात लोकांना बाहेर काढलं. पहाट होईपर्यंत पोलीस आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचल्या होत्या," असं रहमान सांगतात.
"अत्यंत हृदयद्रावक घटना होती. जखमी लोक वेदनेनं रडत होते आणि त्यांच्याकडे पाहण्याचीही हिंमत होत नव्हती," असं रहमान सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























