व्हीडिओ कॉलदरम्यान लघवी केल्यामुळे खासदारानं मागितली माफी

फोटो स्रोत, William Amos - Pontiac/facebook
संसदीय कामकाज व्हर्च्युअल पद्धतीनं म्हणजेच व्हीडिओच्या माध्यमातून सुरू असताना लघवी केल्यामुळे कॅनडाच्या राजकारण्याला माफी मागावी लागली आहे.
विलियम एमस असं या राजकारण्याचं नाव असून ते क्यूबेकमधील फानिया या भागाचं प्रतिनिधित्व करतात. गेल्या महिन्यात ते सहकाऱ्यांसोबत सुरू असलेल्या व्हीडिओ कॉलसाठी नग्नावस्थेत उपस्थित राहिले होते.
"माझ्या या कृतीमुळे मला लाज वाटत आहे आणि यामुळे इतरांना जो मनस्ताप झाला याचं मला दु:ख आहे," असं एमस यांनी गुरुवारी म्हटलं.
'अस्वीकाहार्य' आणि 'अपघात्मक', असं या घटनेचं वर्णन त्यांनी केलं आहे.
विल्यम एमस हे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाचे सदस्य आहेत.
एका निवेदनात त्यांनी म्हटलंय, "मी माझ्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार असलो तरी काही कामांपासून सध्या दूर राहणार आहे."
"मला माझे कर्मचारी आणि कुटुंबाकडून मिळत असलेल्या प्रेमाबाबत मी त्यांचा आभारी आहे," असंही ते म्हणाले.
'प्रामाणिक चूक'
एमस हे पर्यावरणविषयक वकील आहेत आणि 2015 पासून संसदेचे सदस्य आहेत.
एप्रिल महिन्यात सहकाऱ्यांबरोबर सुरू असलेल्या व्हीडिओ कॉलदरम्यान ते नग्नावस्थेत समोर आले होते. यावर ऑफिसचे कपडे परिधान करताना चुकून व्हीडिओ सुरू झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.
या घटनेमुळे लाजिरवाणं वाटत आहे, पण अशी चूक पुन्हा होणार नाही, असं एमस यांनी यावेळी म्हटलं होतं.
एमस हे व्हीडिओ कॉलदरम्यान इतर राजकारणी आणि कर्मचारी यांच्यासमोर होते. पण, या 46 वर्षीय राजकारण्याचा नग्नावस्थेतील फोटो सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

फोटो स्रोत, CANADIAN PRESS/SHUTTERSTOCK
खासदार सेबॅस्टियन लेमीर यांनी हा फोटो काढल्याचं मान्य केलं आणि माफी मागितली. पण, हा फोटो सोशल मीडियावर कसा प्रसारित झाला, याविषयी काही कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलं.
संसदेचे सभापती अँथनी रोटा यांनी ही घटना 'अनैतिक' असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी संसदेच्या सदस्यांना कामकाजादरम्यानच्या नियमांची आठवण करून दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























