जगातला 'सर्वांत मोठा ससा' गेला चोरीला

डॅरियस ससा

फोटो स्रोत, West Mercia Police

फोटो कॅप्शन, डॅरियस नावाचा हा ससा जगातल्या सर्वात मोठा ससा आहे. त्याची लांबी आहे 4 फूट!
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

जगातला 'सर्वांत मोठा ससा' असा किताब जिंकलेला 4 फूट लांबीचा ससा त्याच्या पिंजऱ्यातून चोरीला गेला आहे.

डॅरियस नाव असणारा हा ससा इंग्लंडमधल्या वुर्स्टशायर इथून शनिवारी, 10 एप्रिलला चोरीला गेला आहे.

त्याची मालकीण अॅनेट एडवर्ड्स हिने त्याला शोधून देणाऱ्या देणाऱ्या व्यक्तीला 1000 पौंडांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

माझ्यासाठी हा खूपच वाईट दिवस आहे असंही त्या म्हणाल्या.

या सशाची लांबी तब्बल 129 सेंटीमीटर्स म्हणजे 4 फूट 2 इंच इतकी आहे. याला 2010 साली जगातला सगळ्यांत मोठा ससा असं घोषित केलं होतं.

वेस्ट मेरिका इथल्या पोलिसांचं म्हणणं आहे की डॅरियस शनिवारी रात्री त्यांच्या मालकांच्या अंगणात ठेवलेल्या पिंजऱ्यातून चोरीला गेला.

अॅनेट यांनी म्हटलंय की हा ससा 'खूपच म्हातारा झाला आहे आणि आता प्रजननक्षम नाही'. ज्यांनी कोणी हा ससा नेलाय, त्यांनी सुरक्षित परत आणून द्यावा अशी विनंतीही त्यांनी केली.

या आधी डॅरियसची आई - अॅलिस जगातला सगळ्यांत मोठा ससा होती. तिच्या चार पिल्लांनी आजवर किताब जिंकले आहेत अशी माहिती अॅनेट एडवर्ड्स यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)