जो बायडन यांची 'आता वेळ घालवू नका' म्हणत हवामान बदल पथकाची घोषणा

जो बायडन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जो बायडन
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या हवामान बदल आणि ऊर्जा पथकाची घोषणा केली. हवामान बदलासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात हे पथक आघाडीने काम करेल, असं बायडन म्हणाले.

जो बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या अनेक धोरणांना विरोध दर्शवला होता. सत्तेत आल्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा वेगळे निर्णय घेण्याचा प्रयत्न जो बायडन यांचा आहे.

आता बिलकुल वेळ घालवू नका, असं जो बायडन त्यांच्या हवामान बदल पथकाला म्हणाले.

या पथकाला पर्यावरण सुरक्षा संस्था (EPA) असं संबोधण्यात आलं आहे. अमेरिकन संसदेची EPA ला मंजुरी मिळाल्यानंतर त्यामध्ये कृष्णवर्णीय व्यक्तीचा सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे.

जो बायडन हे येत्या 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. प्रशासनात अमेरिकेचं वैविध्य दर्शवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी हवामान बदलाबाबत स्वीकारलेलं धोरण पूर्णपणे बदलण्याचा बायडन यांचा विचार आहे.

आता आपण पॅरिस हवामान बदल करारातही सहभाग घेणार असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे. हवामान बदल क्षेत्रातही अमेरिका जगाचं प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास बायडन यांनी व्यक्त केला.

डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात अमेरिका पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडला होती. अशा प्रकारे करारातून बाहेर पडणारा अमेरिका पहिलाच देश ठरला होता.

आपण नियुक्त केलेलं हवामान बदल आणि ऊर्जा पथक कामासाठी सक्षम असल्याचंही बायडन म्हणाले.

जो बायडन

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जो बायडन

या पथकाचे प्रमुख म्हणून नॉर्थ कॅरोलिना येथील पर्यावरण तज्ज्ञ मायकल रेगन यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसंच न्यू मेक्सिको प्रांताचे प्रतिनिधी देब हॉलंड यांना पथकात स्थान देण्यात आलं आहे.

त्याशिवाय पर्यावरणविषयक वकील ओबामा प्रशासनात अधिकारी म्हणून काम केलेल्या ब्रेंडा मॅलोरी, मिशिगनच्या माजी गव्हर्नर जेनिफर ग्रॅनहोम यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

हवामान बदल रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेने लढा देण्यात येईल, असं पथकाने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)