You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नासा आणि स्पेक्सएक्सचं यान 4 माणसांना घेऊन रवाना
अमेरिकेच्या तीन आणि जपानच्या एका अंतराळवीरांना घेऊन नासा आणि स्पेस एक्स यांनी संयुक्तपणे रविवारी ऑपरेशनल कमर्शियल क्रू मिशन मोहिमेचा शुभारंभ केला.
नासा आणि स्पेसएक्सने चार अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला रवाना केलं आहे. स्पेसएक्स रॉकेटने त्यांना पाठवण्यात आलं. नासाने याचा पूर्ण व्हीडिओ त्यांच्या ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोहिमेसाठी नासा आणि स्पेसएक्सचं अभिनंदन केलं आहे.
स्पेसएक्स कंपनीचं हे माणसांना घेऊन अवकाशात जाणारं दुसरं उड्डाण आहे. भविष्यात अशा मोहिमा सातत्याने आयोजित केल्या जातील असं नासाने म्हटलं आहे.
रविवारी रात्री केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन रॉकेट चार अंतराळवीरांना घेऊन रवाना झालं. यामध्ये शॅनन वॉकर, मायकल हॉपकिन्स आणि व्हिक्टर ग्लोवर हे अमेरिकेचे आहेत तर सोइची नोगुची जपानचे आहेत.
यंदाच्या वर्षांत निर्माण झालेल्या अडीअडचणींना पार करत ही मोहीम होत असल्याने कॅप्सूलचं नाव resilience ठेवण्यात आलं आहे.
लाँचवेळी अंतराळवीरांचे कुटुंबीय केनेडी स्पेस सेंटरमध्ये उपस्थित होते. कोरोना संदर्भात नियमांमुळे एलॉन मस्क उड्डाणाच्या वेळी उपस्थित नव्हते.
उड्डाणापूर्वी सर्व अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अंतराळयानाचंही सर्वांगीण परीक्षण करण्यात आल्याचं नासाने सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)