अमेरिका निवडणूक निकाल : ट्रंप की बायडन, कोण आहे आघाडीवर?

ट्रंप विरुद्ध बायडन
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. काही राज्यांत बायडन आघाडीवर आहेत, तर काही ठिकाणी ट्रंप आघाडीवर आहेत.

आतापर्यंत 50 राज्यांपैकी 19 राज्यांतले कलसमोर येत आहेत. साउथ कॅरोलिना राज्यात ट्रंप विजयी होतील, असं अनुमान आहे. त्याचसोबत अलाबामा, नॉर्थ डाकोटा, साउथ डाकोटा राज्यातही ट्रंप यांच्या विजयाचं अनुमान आहे.

दुसरीकडे बायडन हे कनेक्टिकट, न्यूयॉर्क, कोलोरोडो राज्यांमध्ये बायडन विजयी होतील असा कल आहे.

ट्रंप विरुद्ध बायडन

डोनाल्ड ट्रंप हे टेनेसीमधून विजयी होत असल्याचं अनुमान आहे.

बिल क्लिंटन यांच्यानंतर टेनेसीनं कायमच रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारालाच मतं दिली आहेत. 2016मध्ये ट्रंप हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा 26 पॉइंट्सनं आघाडीवर होते.

वेस्ट व्हर्जिनियामधूनही ट्रंप यांच्या विजयाचं अनुमान आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये या राज्यानं रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनेच कौल दिला आहे.

अर्कान्सासमध्येही ट्रंप विजयी होतील असं अनुमान आहे.

'या' राज्यांचा कल जो बायडन यांच्या बाजूने

जो बायडन हे व्हर्मोन्टमधून विजयी होतील असं अनुमान आहे. हे राज्य डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानलं जातं.2016 साली हिलरी क्लिंटन यांना इथून 56 टक्के मतं मिळाली होती.

या राज्यात इलेक्टोरल कॉलेजची तीन मतं आहेत.

बायडन

फोटो स्रोत, Getty Images

डेलावर, मेरिलँड, मॅसेच्युसेट्स आणि न्यू जर्सी या राज्यांमधूनही जो बायडन हे विजयी होत असल्याचा सुरूवातीचा कल आहे.

ट्रंप इंडियानामधून जिंकण्याचं अनुमान

इंडियानामधून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप विजयी होत असल्याचा अंदाज आहे. हे राज्य उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचं गृहराज्य आहे आणि इथून सहसा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवारच विजयी झाल्याचं पहायला मिळतं.

मात्र, 2008 साली इंडियानामधून बराक ओबामा विजयी झाले होते.

इंडियानामध्ये इलेक्टोरल कॉलेजची 11 मतं आहेत.

अमेरिका निव़डणूक : आतापर्यंत काय काय घडलं?

  • राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 50 राज्यांतील मतदान केंद्रांवर नऊ वेगवेगळ्या टाइमझोननुसार मतदान सुरू झालं.
  • अमेरिकेतली बहुतांश राज्यांमधील मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे. या राज्यांमध्ये एकूण 238 इलेक्टोरल वोट्स आहेत.
  • अमेरिकन वेळेनुसार रात्री आठ वाजेपर्यंत अलाबामा, कनेक्टिकट, डेलावेअर, फ्लोरिडा, इलिनॉयस, मेरिलँड, मेसेच्युसेट्स, मिसिसिपी, मिझोरी, न्यू हॅम्पशायर, न्यू जर्सी, ओक्लाहामा, पेन्सिल्वेनिया, ऱ्होड आयलंड आणि टेनेसीमधली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
मतदार

फोटो स्रोत, Getty Images

  • एका आशियाई-अमेरिकन रिपब्लिकन गटानं अधिकृतरित्या डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना समर्थन दिलं आहे. या गटानं आपल्या हजारो सदस्यांना बायडन यांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
  • उत्तर कॅरोलिनामधले निकाल 45 मिनिटं उशीरा येऊ शकतात, कारण इलेक्शन बोर्डानं तांत्रिक कारणामुळे चार मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया उशीरा सुरू केली होती.

पाच राज्यांत 2016 च्या तुलनेत जास्त मतदान

यावेळी अमेरिकेत विक्रमी मतदानाची चर्चा सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामधील प्राध्यापक मायकल मॅकडोनाल्ड सांगतात की, ओरेगन अमेरिकेतली पाचवं राज्य आहे, जिथे 2016 च्या तुलनेत जास्त मतदान झालं आहे.

टेक्सास, हवाई, मोंटाना, वॉशिंग्टन आणि आता ओरेगन इथं मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला. टेक्सासमध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यामध्ये चुरशीची लढत असल्याचं सांगितलं जातंय.

सुरूवातीच्या टप्प्यात 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी मतदान केल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर