कोरोना: जिम सुरू न होण्याचं कारण काय?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

कोरोना काळात जिमवर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते, काही ठिकाणी अजूनही आहेत. यामागची नेमकं कारणं काय?

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व्यवसाय बंद होते. अनलॉक प्रक्रियेत जिम अर्थात व्यायामशाळा आणि धार्मिकस्थळं मात्र उघडण्यात आली नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यायामशाळा सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे.

युकेतील जिम सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा जिम बंद करण्यात आल्या आहेत.

युकेतली व्यायामशाळांवरील बंदी संपूर्ण देशाला लागू नाही. इंग्लंडमधील अलर्ट व्यवस्थेनुसार, ट्रेडमिल असलेली जिम बंद करण्यात आली आहेत.

जिम बंद करण्यामागची कारणं काय आहेत? कोरोना काळात दुकानं आणि हॉटेलांपेक्षा जिम सुरू करणं धोकादायक आहे का?

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार एकीकडे फिट राहायला सांगत दुसरीकडे जिम बंद ठेवण्यात आल्या आहेत. युकेतील एका जिम मालकाला सोशल मीडियावरील पोस्टकरता दंड ठोठावण्यात आला. त्याने लिहिलं जिम सुरू राहायला हव्यात. यामागे आमचा आर्थिक फायदा हे कारण नाही तर जिम मेंबरच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ते आवश्यक आहे.

जिम युझर्सनी जिम बंद करण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याचं न्यूजबीटला सांगितलं.

शास्त्र काय सांगतं?

नॉटिंगहॅम विद्यापीठातील प्राध्यापक जोनाथन बॉल विषाणू संदर्भातील जाणकार आहेत.

व्यायाम करताना तुमच्या शरीराची मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. तुमचा श्वासोच्छवास वेगाने होतो आणि तुम्ही खोल श्वास घेता असं प्राध्यापक बॉल यांनी सांगितलं.

त्यामुळे व्यायाम करताना ड्रॉपलेट्स म्हणजे शिंक किंवा बोलताना निघणारे तुषार बाहेर पडू शकतात. ते जिममधील अन्य व्यक्तींकडे पसरू शकतात. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.

जिममध्ये व्यायाम करताना अनेक उपकरणांना, वस्तूंना संपर्क केला जातो. चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी या वस्तूंना स्पर्श केलेला असू शकतो. या माध्यमातून विषाणू पसरू शकतात.

पण यावर उपाय आहे.

जिममध्ये कोरोनाचा संसर्ग असलेला धोका काळजीपूर्वक कमी करता येऊ शकतो. प्रभावी वातानुकूलित यंत्रणा, सातत्याने सफाई, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या गोष्टींद्वारे कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो.

इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचा डेटा पाहिला तर जिम सेंटर्स कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहेत याची मला तरी माहिती नाही.

जिमवर कठोर निर्बंध असतील तर सरकारने आणि शास्त्रज्ञांनी कठोर निर्बंधामागची कारणं स्पष्ट करायला हवीत.

ज्या ठिकाणांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी ठिकाणी माणसांची वर्दळ वाढू नये यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याचवेळी आर्थिक समतोल बिघडू नये याकडे त्यांना लक्ष द्यावे लागेल.

त्यामुळे काही निर्बंध नागरिकांना अनाठायी वाटू शकतील. पब वगैरेंना सुरू राहायला परवानगी मिळू शकते. काही गोष्टी, काही केंद्रांवर निर्बंध लागू असतील. काहींवर नसतील कारण त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग फारसा झालेला नाही.

आर्थिक परिणामांकडे नुकसानीच्या बाबतीत कमी धोक्याचे म्हणून पाहिलं जातं. पण हा राजकीय निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय आपल्यापैकी अनेकांना चक्रावून टाकू शकतो.

जिम चालकांचं काय म्हणणं?

मी या निर्णयाने चकित झालो आहे, चक्रावून गेलो आहे, गोंधळात पडलो आहे असं ट्रेनर नॅथन पेनमन यांनी सांगितलं.

आम्हा सगळ्यांमध्येच विचित्र भावना आहे. जिममध्ये काम करणाऱ्या सगळ्यांमध्ये सुरू ठेवण्याबाबत एकमत होतं.

लिव्हरपूलमधल्या 28वर्षीय व्यक्तीने जिम सेशननंतर न्यूजबिटशी बातचीत केली. त्यानंतर जिमवर निर्बंध लागू करण्यात आले.

जिम का बंद होत आहेत हे प्रत्येकाला समजू शकणार नाही. किरकोळ व्यापारी केंद्र आणि हॉटेल्स सुरू राहतील असं त्यांनी सांगितलं.

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जिमचा उपयोग करणं महत्त्वाचं असल्याचं नॅथन यांनी सांगितलं.

आरोग्य आणि फिटनेस आणि त्यातही शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे प्रत्येक देशाचं प्राधान्य असायला हवं.

त्यामुळे सरकारने सुरू झालेल्या जिम बंद करणं यातून समाजात चुकीचा संदेश जातो.

जिममध्ये व्यायाम करायला येणाऱ्या प्रत्येकाने नियमांचं पालन केलं होतं असं नॅथन यांनी सांगितलं. मात्र 29 वर्षीय जॅक ऑक्लीशॉ यांना जिम सुरू होण्याबाबत साशंकता वाटते.

नॉटिगहॅम भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. जॅक तिथे राहतात. नॉटिंगहॅमशायरमध्ये टियर 2 निर्बंध लागू आहेत. तिथे जिम सुरू आहेत.

जिममध्ये जाण्यासाठी मी आतूर झालो होतो. त्यामुळे जिम सुरू झाल्या झाल्या मी लगेच तिकडे गेलो असं जॅक यांनी सांगितलं.

जिममधील कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना केल्या होत्या. जेणेकरून तुम्हाला तिथे सुरक्षितपणे व्यायाम करता येईल.

मात्र अनेक जिमचे सदस्य नियमांचे पालन करत नव्हते असं त्यांनी सांगितलं.

जिममधील उपकरणं वापरल्यानंतर अनेक सदस्य ते पुसून काढत नव्हते. जिममधील कर्मचाऱ्यांनी नियम अधिक कठोरपणे लागू करावेत असं त्यांना वाटतं.

मानसिक आरोग्य उत्तम राहावं आणि माझ्या डोक्यात नकारात्मक विचार येऊ नयेत यासाठी मी पोहायला जातो.

आमच्या जिममध्ये जाण्याआधी वेळेसाठी नोंदणी करावी लागते. पण लोक तसं न करता थेट जातात, त्यांना वाटतं आपण जाऊन थेट उपकरणं हाताळू शकतो.

त्यामुळे जॅक यांनी कमीत कमी वेळा जिममध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)