You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अझरबैजानचा दावा- आर्मेनियाचे लढाऊ विमान दुसऱ्यांदा पाडले
अझरबैजानच्या सैन्याकडून जेबरैलच्या परिसरात आर्मेनियाचे दुसरे एसयू-25 विमान पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्यांच्याकडून यासाठीचा कोणताही पुरावा फोटो, व्हिडिओ किंवा इतर काहीही सादर करण्यात आलेले नाही.
आर्मेनियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही वेळेला विमान पाडल्याचे दावे फेटाळले आहेत. सीमेच्या उत्तर भागात आर्मेनियाने गोळीबार केल्याचंही अझरबैजानने म्हटलं आहे. हा परिसर तोवूज शहराच्या जवळ आहे.
या घटनेचाही कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्या भागात गोळीबार केलेला नाही असंही आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
शांतता करार सुरू होण्यापूर्वी रेडक्रॉसने जखमींना युद्धभूमीवरून काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण अझरबैजानने नकार दिल्याचा आरोप आर्मेनियाच्या सैन्याने केला आहे.
दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पण यासंदर्भात अद्याप पुष्टी मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी माहिती देणे गरजेचे आहे. कारण दोन्ही देश केवळ युद्धभूमीवर लढत नाहीत तर शक्य त्या मार्गाने आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांचा विरोध करत आहेत.
आर्मेनियाने मृत्यू झालेल्या आपल्या सैनिकांच्या यादीत 40 नवीन नावांचा समावेश केला आहे. आतापर्यंत आर्मेनियाच्या एकूण 673 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर अझरबैजानकडून अद्याप अशी यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
अझरबैजान आणि आर्मेनियाच्या लढाईत पाकिस्तानी विशेष दल?
पाकिस्तानचे विशेष दल अझरबैजानच्या सैन्यासोबत आर्मेनिया विरोधात युद्धात सहभागी होत असल्याचा आरोप आर्मेनियाकडून करण्यात आला आहे. हा दावा पाकिस्तानाने फेटाळला आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांचे वक्तव्य 'निराधार आणि अयोग्य' असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)