कोरोना व्हायरस : फ्रान्सच्या 9 शहरांत रात्रीचा कर्फ्यू लावण्याची वेळ

फोटो स्रोत, EPA
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे फ्रान्सची राजधानी पॅरिससह इतर 9 जिल्ह्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा कर्फ्यू रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत असून या कालावधीत लोकांनी आपल्या घरातच राहावं, असं आवाहन राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन बोलत होते. शनिवारपासून (17 ऑक्टोबर) या 9 शहरांत कर्फ्यू लावण्यात येईल. हा नियम कमीतकमी चार आठवडे तरी कायम राहील.
फ्रान्समध्ये आरोग्य आणीबाणीसुद्धा लागू करण्यात आली आहे.
बुधवारी (14 ऑक्टोबर) फ्रान्समध्ये तब्बल 22 हजार 951 नवे रुग्ण सापडले.
नेदरलँड्समध्येही काल रात्री दहा वाजल्यापासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आहं आहे
तत्पूर्वी, स्पेनच्या उत्तर भागात कॅटालोनिया परिसरात गुरुवारपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला.
कोरोना व्हायरसमुळे चेक गणराज्यात सर्व शाळा आणि बार बंद करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात चेक गणराज्यातच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते.
संपूर्ण युरोपात कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ लागली आहे. रशियात बुधवारी कोरोनाचे 14, 321 नवे रुग्णण आढळून आले तसंच 239 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
फ्रान्सकडून नवीन उपाययोजना
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितलं, "मार्च-एप्रिल महिन्यात जी कोरोनाची साथ पसरली होती. त्यावेळी संपूर्ण फ्रान्समध्ये कोरोना व्हायरस पसरला होता. पण, त्यापेक्षा सध्याची लाट वेगळी आहे.

फोटो स्रोत, PASCAL GUYOT
सुरुवातीला कर्फ्यू चार आठवडे कायम राहील, त्यानंतर सरकार हा कर्फ्यू वाढवू शकतं.
कर्फ्यू कालावधीत रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत लोक घराबाहेर पडू शकणार नाहीत.
या कर्फ्यूचा दैनंदिन कामकाजावर कोणताच परिणाम होणार नाही. शाळा सुरू असतील तर एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यावरसुद्धा कोणतेच निर्बंध नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























