पोलंडच्या इगानं रचला इतिहास, फ्रेंच ओपनवर कोरलं नाव

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

फ्रेंच ओपन स्पर्धेत पोलंडच्या इगा शियाँतेकने इतिहास रचला आहे. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या सोफियावर इगा शियाँतेकने मात केली.

पोलंडच्या 19 वर्षीय इगा शियाँतेकने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जिंकून इतिहास रचला आहे.

इगा शियाँतेक वर्ल्ड रँकिंगमध्ये 54 व्या स्थानावर आहे. या रँकिंगवर असणाऱ्या कुठल्याही खेळाडूने आजवर फ्रेंच ओपन जिंकलं नव्हतं. ईगाने मात्र फ्रेंच ओपन जिंकत विक्रमाची नोंद केली आहे.

शिवाय, हे किताब पटकावणारी इगा शियाँतेक ही पोलंडमधील पहिला खेळाडू ठरली आहे.

अमेरिकेची सोफिया ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलीय, तर इगा शियाँतेक अनसायडेड खेळाडू म्हणून फ्रेंच ओपनच्या स्पर्धेत आली होती. मात्र, आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तिने विजेतेपदावर नाव कोरलं.

अंतिम सामन्यात इगा शियाँतेकने 6-4,6-1 च्या सेटने सोफियावर मात केली.

विजयानंतर भाषणात इगा शियाँतेक म्हणाली, "सर्वप्रथम हेच सांगते की, मला भाषण करायला येत नाही. कारण मी शेवटचा सामना दोन वर्षांपूर्वी जिंकला होता. पण मला खरंच आज काय बोलावं आणि कुणाकुणाचे आभार मानावे हे सूचत नाहीय."

अशा संकटाच्या काळातही ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे आभार, अशा भावना इगाने व्यक्त केल्या.

तसंच, "हा क्षण माझ्यासाठी सर्वात सुंदर आहे. कारण दरवर्षी मी रफाल नदालला ट्रॉफी उचलताना पाहिलंय आणि आज मी त्या ठिकाणी आहे," असं इगा म्हणाली.

यावेळी इगाने पोलंडवासियांचेही आभार मानले. मायदेशात परतल्यावर सगळ्यांना आनंद होईल, असंही ती म्हणाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)