कोरोना : मास्क म्हणून साप चेहऱ्याभोवती गुंडाळून तो बसमध्ये चढला आणि...

फोटो स्रोत, PA Media
कोरोनाकाळात मास्क ही आता गरजेची गोष्ट झाली आहे. त्यामुळे आता मास्कमध्येही व्हरायटी येत आहेत, त्यातही फॅशन स्टेटमेंट शोधलं जाऊ लागलं आहे.
मास्कमध्ये काही चित्रविचित्र प्रकारही पहायला मिळतात. पण युकेमध्ये आगळ्यावेगळ्या मास्कवरही कडी करणारा प्रकार लोकांनी पाहिला.
सोमवारी (14 सप्टेंबर) स्विन्टनहून मँचेस्टरला जाणाऱ्या बसमध्ये एक प्रवासी चढला. त्याने मानेभोवती आणि तोंडाला चक्क एक साप गुंडाळला होता.
मला आधी वाटलं होतं की त्यानं मजेशीर मास्क घातला आहे, त्या बसमधून प्रवास करणारी एक महिला सांगत होती. पण जेव्हा हँड रेलिंग्जवर तो साप वळवळायला लागल्यावर तो 'मजेशीर मास्क' ही नेमकी काय भानगड आहे, ते लक्षात आलं.
या महिला प्रवाशानं नाव उघड न करण्याच्या अटीवर म्हटलं की, तो प्रकार खरंच 'गंमतीदार' होता. शिवाय, त्या सापानं इतर प्रवाशांना कोणताही त्रास दिला नाही.

फोटो स्रोत, PA Media
"अर्थात, बसमधले सर्वजण नजरही न हटवता त्या प्रवाशाकडे पाहत होते," असंही त्यांनी म्हटलं.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करण्यासाठी मास्क घालणं बंधनकारक आहे. अकरा वर्षापेक्षा कमी वयाची मुलं तसंच काही आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनाच या नियमातून सवलत देण्यात आली आहे.
ग्रेट मँचेस्टर ट्रान्सपोर्टच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, "सरकारनं जी मार्गदर्शक तत्त्वं सांगितली आहेत, त्यानुसार सर्जिकल मास्कच घातला पाहिजे असं नाही. प्रवासी त्यांच्या सोयीनुसार, आवडीनुसार मास्क बनवू शकतात. स्कार्फ किंवा बंदानाही मास्क म्हणून वापरला जाऊ शकतो.
अर्थात, या नियमाचा अर्थ सोयीनं कसा काढायचा यावरही मर्यादा आहेत. कोणीतरी सापाची कातडीच मास्क म्हणून वापरावी, असं अजिबात नाही. खासकरून जेव्हा ती कातडी सापाच्या शरीरावरच असते!"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )
























