कोरोना रुग्णांची संख्या जगभरात 1 कोटीहून अधिक, पाच लाख लोकांचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्यामते या व्हायरसमुळे आतापर्यंत 5,00,108 लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा एक कोटीच्या वर गेला आहे.
यामधील 1.25 लाख पेक्षा जास्त लोक अमेरिकेत, 57 हजारापेक्षा जास्त लोक ब्राझीलमध्ये, 43 हजारापेक्षा जास्त लोक ब्रिटनमध्ये, 34 हजारांपेक्षा जास्त लोक इटलीमध्ये, 29 हजारांपेक्षा जास्त फ्रान्समध्ये, 28 हजारांपेक्षा जास्त स्पेनमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत.
अमेरिका, लॅटिन अमेरिकेतली आणि काही आशियाई देशांमध्ये या व्हायरसचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. हा विषाणू शहरांतून आता दुर्गम प्रदेशातही जाईल अशी भीती व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या जागतिक क्रमवारीत भारत 8 व्या स्थानावर आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

भारत आणि लॅटिन अमेरिकेतली काही देशांमध्ये लहान शहरांमध्ये नवे रुग्ण सापडत आहेत.युरोपियन युनियनमधील देशांचे नवे नियमयुरोपियन युनियनमधील सदस्य देशांनी आपल्या देशात कोण-कोण येऊ शकतं, कोण नाही यासाठी एक नवी नियमावली जाहीर केली आहे.
'सुरक्षित' देशांच्या यादीमधील देशातील लोकच 1 जुलैपासून युरोपियन यूनियन आणि शेंगेन करार झालेल्या प्रदेशात येऊ शकतात. सुरक्षित देशांमध्ये अमेरिकेला अजून स्थान मिळालेले नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलिया, कॅनडामधल्या लोकांना युरोपात येण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अमेरिकेत 1.25 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यूअमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 1.25 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 25 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. द न्यू यॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार लॉस एंजल्स येथे टेस्टिंग नंतर कोरोनासंक्रमित रुग्णांची संख्या 5.8 टक्क्यांवरुन 9 टक्क्यांवर गेल्याचं दिसतं. टेक्सासमध्ये संक्रमित रुग्ण सापडण्याचा दर 7 टक्क्यांवरुन 13 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोनामुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या
- अमेरिका: 128,400
- ब्राझील: 57,174
- युनायटेड किंगडम: 43,550
- इटली: 34,738
- फ्रान्स: 29,778
- स्पेन: 28,343
- मेक्सिको: 26,381
- भारत: 16,487
- ईरान: 10,508
- बेल्जियम: 9732
- पेरू: 9135
- रूस: 9073
- जर्मनी: 9029
- कॅनडा: 8522
- नेदरलैंड्स: 6105
- चिले: 5509
- स्वीडन: 5280
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























