संयुक्त राष्ट्राच्या कारमध्ये सेक्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल, युएन नाराज

फोटो स्रोत, Thinkstock
संयुक्त राष्ट्राच्या अधिकृत गाडीमध्ये झालेल्या सेक्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडं वेधलं गेलं आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबत नाराजी व्यक्त करत ही घटना त्रासदायक असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा व्हीडिओ इस्रायलमधील असल्याचा सांगण्यात येत आहे.
या व्हीडिओ क्लिपमध्ये संयुक्त राष्ट्राच्या कारमध्ये मागच्या सीटवर लाल कपडे परिधान केलेली एक महिला आणि एक पुरूष सेक्स करत आहेत. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तेल अवीव शहरात समुदरकिनारी असलेल्या एका रस्त्यावर ही फिल्म तयार केली गेली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. व्हीडिओत दिसणाऱ्या लोकांचा शोध घेणं सुरू आहे असं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

हे लोक इस्रायलमध्ये असलेल्या एका शांततारक्षक दलातील असू शकतात असं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. या व्हीडिओत पुढच्या सीटवर एक व्यक्ती वाकून बसला आहे तसेच गाडी चालवणारा ड्रायव्हरही दिसत नाही.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी हा 18 सेकंदांचा व्हीडिओ 'बिभत्स' असल्याचं सांगितलं आहे. दुजारिक बीबीसीला म्हणाले, "जर संयुक्त राष्ट्राचे कर्मचारीच असे वागू लागले तर ज्या दुष्ट गोष्टींविरोधात आपण लढत आहोत त्याला अर्थ उरणार नाही. हे सगळं आपल्याविरोधातच जाईल."
कारमधील सेक्स एकमेकांच्या सहमतीनं चाललेला की पैसे देऊन करण्यात येत होता याचाही तपास सुरू असल्याचं दुजारिक यांनी सांगितलं.
आपल्या कर्मचार्यांचे आचरण व त्यांच्या वागण्याबद्दल संयुक्त राष्ट्राने कडक नियमावली तयार केलेली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नियमाचा भंग केला तर त्यावर कारवाई होते. यूएन शांतीदलाच्या मोहिमेतील अशा कर्मचाऱ्यांना माघारी पाठवलं जातं अथवा त्यांच्यावर बंदी घातली जाते. त्या कर्मचाऱ्याच्या देशावर अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी असते.
संयुक्त राष्ट्राच्या शांतीरक्षकांवर आणि इतर कर्मचाऱ्यांवर लैंगिक दुराचाराचे आरोप दीर्घकाळापासून होत आहेत. सध्याच्या काही वर्षांमध्ये त्या आरोपांत वाढ झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांबाबत नरमाईचे धोरण स्विकारणार नाही अशी भूमिका गुटेरस यांनी घेतली होती.
या व्हीडिओबाबतचं UNचं म्हणणं
दुजारिक म्हणतात, "आम्ही हैराण झालो आहोत. हा व्हीडिओ त्रासदायक आहे. संयुक्त राष्ट्र संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनास्थळाबाबत संशय नाही. व्हीडिओत जे लोक दिसत आहेत त्यांची ओळख पटण्याच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलो आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
व्हीडिओत दिसत असलेल्या इमारतीमुळे हा व्हीडिओ हयारकोन रस्त्यावर चित्रित झाल्याचे दिसते. हा परिसर लोकांचा फिरायला जाण्याचा आहे.
तपास लवकर संपून दोषींवर उचित कारवाई होईल अशी आशाही दुजारिक यांनी व्यक्त केली आहे.
या व्हीडिओतील व्यक्ती ट्रुस ऑर्गनायझेशन (UNTSO) च्या असू शकतात असं म्हटलं जात आहे. या भागात ही संघटना 1984 पासून काम करत आहे.
संयुक्त राष्ट्राचा लैंगिक दुराचाराबाबतचा इतिहास
हा व्हीडिओ पाहून आपल्याला कोणताही धक्का बसला नाही अशी प्रतिक्रिया ह्युमन राइट्स वॉचच्या महिलाधिकार विभागाच्या सहनिदेशक हिदर बार्र यांनी दिली आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रासाठी बुरुंडी आणि अफगाणिस्तानात काम केलं आहे.
संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप होणं ही गंभीर समस्या आहे असं त्या सांगतात.
2019 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांवर लौंगिक शोषणाचे एकूण 175 आरोप झाले. त्यातील 16 प्रकरणात कर्मचारी दोषी आढळले. 15 प्रकरणांत कोणताही पुरावा सापडला नाही. बाकी प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























