वर्ल्ड कपः मॅचदरम्यान पाकिस्तान-अफगाणिस्तानचे चाहते भिडले

फोटो स्रोत, Getty Images
वर्ल्ड कप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी चुरस कडवी झाली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान मॅचवेळी याचा प्रत्यय पाहायला मिळाला. या मॅचदरम्यान पाकिस्तान-अफगाणिस्ताचे चाहते एकमेकांविरुद्ध भिडले.
अफगाणिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना 227 धावांची मजल मारली. पाकिस्तानने 3 विकेट्स राखून ही मॅच जिंकली.
अफगाणिस्तानची इनिंग्ज सुरू असतानाच दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये वादावादी झाल्याचं वृत्त पसरलं.
सोशल मीडियावर यासंदर्भात फोटो आणि व्हीडिओ शेअर करण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर दोन चाहत्यांना मैदानाबाहेर काढण्यात आलं.
आयसीसीच्या प्रवक्त्याने ही घटना मैदानाबाहेर झाल्याचं सांगितलं.
काही चाहत्यांमध्ये हाणामारी झाल्याची आम्हाला कल्पना आहे. स्थानिक पोलीस आणि मैदानातील सुरक्षा यंत्रणा मिळून पुन्हा अशी अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं आयसीसीच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"अशा पद्धतीचं गैरवर्तन जराही खपवून घेतलं जाणार नाही. सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या हजारो चाहत्यांच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा करण्यात येईल. अशा पद्धतीच्या वागण्यामुळे सामाजिक शिस्त बिघडते", असं या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांचं काय म्हणणं?
मैदानात प्रवेश करण्यावरून हा वादंग झाल्याचं वेस्ट यॉर्कशायर पोलिसांचं म्हणणं आहे.
"स्थानिक वेळेनुसार, दुपारी 11 वाजून 55 मिनिटांनी मैदानाबाहेर काहीतरी गडबड झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. काही चाहते मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याठिकाणी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत", असं प्रवक्ता टोनी टीर्ने यांनी सांगितलं.
मॅचचा काय परिणाम?
पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धची ही मॅच जिंकत सेमी फायनलसाठी मजबूत दावेदारी सिद्ध केली आहे. पाकिस्तानने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. तीनमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे तर एक मॅच रद्द झाली आहे. त्यांचे 9 गुण झाले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
दुसरीकडे अफगाणिस्तानला आठपैकी आठ सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अफगाणिस्तानला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























