अमिताभ बच्चन यांना चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "हैद्राबादमध्ये 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचा अॅक्शन सीन चित्रीत करत असताना मी जखमी झालो आहे. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. चित्रीकरणही रद्द करण्यात आलं. एआईजी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीही झाली."

"आता मी माझ्या घरी परतलो आहे. जखमी जागेवर पट्टी बांधण्यात आली आहे. शिवाय औषधोपचारही सुरू आहेत. वेदनाही होत आहे. हालचाल करण्यासाठी तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. प्रकृती सुधारण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागेल. या गंभीर दुखापतीमुळे माझी इतर कामही सध्या बंद आहेत."

पुढे ते म्हणाले, "जोपर्यंत मी ठीक होत नाही तोपर्यंत माझं काम बंद राहील. सध्यातरी मी जलसामध्ये (मुंबईमधील अमिताभ यांचा बंगला) आराम करत आहे."

तसेच अधिक त्रास होऊ नये म्हणून अमिताभ पूर्णपणे आराम करणार आहेत. शिवाय चाहत्यांना भेटण्यासाठी ते जलसा बंगल्याबाहेरही या आठवड्यामध्ये येणार नाहीत. सध्या त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)