You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमचं विश्व समृद्ध करा: आम्हाला टॅग करा आणि BBC मराठीवर झळकण्याची संधी मिळवा
बीबीसी न्यूज मराठीच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे
बीबीसी न्यूज मराठीसोबतच बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या सर्व 42 भाषांमधून आम्ही संपादकीयदृष्ट्या सशक्त, परिणामकारक आणि उच्च गुणवत्तेची पत्रकारिता करत आलो आहोत.
जगभरातल्या 48 कोटींहून अधिक लोकांना आम्ही रेडियो, टीव्ही, डिजिटल, मोबाईल आणि सोशल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सेवा प्रदान करतो.
याचाच अर्थ असाही आहे की, जगाच्या जडणघडणीत बीबीसीची महत्त्वाची सांस्कृतिक भूमिका आहे.
आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून आमच्या असं लक्षात आलं की, आमच्या वाचकांचा - खासकरून तरुणांचा - कल स्वतःची सर्वांगीण प्रगती करण्याकडे आहे.
तुमची पार्श्वभूमी काय आहे किंवा तुम्ही काय करता, हे आता तितकंसं महत्त्वाचं नाही. तुमची क्षमता आणि जिद्द अधिक महत्त्वाच्या आहे. गर्दीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा संकल्प आणि उद्यमशीलता हे देखील महत्त्वाचे आहेत.
तुमच्या भवतालचे जग कसे आहे, हे ओळखून त्यात तुमची काय भूमिका आहे हे शोधण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे, त्यात बीबीसी तुम्हाला सहकार्य करू इच्छित आहे. याचा अर्थ 'तुमचे विश्व समृद्ध करणे' असाच आहे.
तुमच्यासारखे बीबीसीचे प्रेक्षक, वाचक आणि श्रोते हे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणून खास तुमच्यासाठी 'तुमचे विश्व समृद्ध करा' ही मोहीम आम्ही आखली आहे.
तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. तुमची स्वप्नं विशाल आहेत. या जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटू शकते असा विश्वास तुमच्या ठायी आहे.
आपल्या कार्याचा परीघ केवळ गाव, शहर किंवा देशापुरताच मर्यादित न राहता त्याच्यापुढेही जाईल असा दृढ विश्वास तुमच्या मनात आहे. तुम्ही जी उंच झेप घेत आहात, त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. आमचा वाटा खारीचा असेल, पण तो खचितच महत्त्वाचा असेल.
बातमी वाचून वाचकांच्या आयुष्यात काय सकारात्मक फरक पडू शकतो, या गोष्टीला अधिक महत्त्व आहे असं आम्हाला वाटतं. आपले भवताल कसे आहे आणि या जगात आपले स्थान काय आहे, हे शोधण्यास वाचकाला जी माहिती मदत करते, तीच बातमी असते अशी या मोहिमेनुसार व्याख्या तयार करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान दिलेल्या बातम्यांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. आम्ही टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म, आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग आणि बीबीसीच्या भारतात कार्यरत असलेल्या विविध वेबसाइट्स या मार्गांनी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.
तुम्हाला प्रेरणा देतील अशा देश-विदेशातील गोष्टींचा, लेखांचा संग्रह आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. जेव्हा तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावतील तेव्हा सर्व काही शक्य आहे, असा विश्वास तुमच्या मनात येईल.
तुम्ही या मोहिमेत प्रत्यक्षरीत्या देखील भाग घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला एखादी प्रेरणादायी व्यक्ती किंवा संस्था असेल किंवा तुमच्यामुळे इतर कुणाला प्रेरणा मिळू शकत असेल तर आमच्याशी संपर्क साधा. कदाचित तुमची गोष्ट देखील बीबीसीवर येऊ शकेल.
तुम्ही बीबीसीच्या व्हर्च्युअल बिलबोर्डवर देखील झळकू शकता. आमच्या कॅंपेनचे इंस्टाग्राम फिल्टर वापरा तुम्हाला बीबीसीच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवर झळकण्याची संधी मिळू शकते.
इंस्टाग्रामच्या फिल्टर सेक्शनमध्ये 'BBC News' सर्च करा किंवा या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर @bbcnewsmarathi ला तुमच्या पोस्टमध्ये टॅग करा.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)