धावती ट्रेन, संपत चाललेला ऑक्सिजन आणि संकटात सापडलेलं 13 महिन्यांचं बाळ....

ऑक्सिजन पुरवठा, आरोग्य,कोलकाता, मुंबई
फोटो कॅप्शन, बाळाचा ऑक्सिजन लावून प्रवास सुरू होता.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोलकत्ता येथून नेहमीप्रमाणे गीतांजली एक्स्प्रेस निघाली होती. मुंबईच्या दिशेने निघालेली ही एक्स्प्रेस जळगाव मध्ये जवळपास सात तास उशिराने आली होती.

याच रेल्वेत कोलकाता ते मुंबई एक महिला आपल्या 13 महिन्यांच्या बाळाला घेऊन असा प्रवास करीत होती. शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजीची मध्यरात्रीची ही घटना आहे.

गीतांजली एक्सप्रेसने ही महिला मुंबईकडे आपल्या बाळाला उपचारासाठी घेऊन जात होती.

13 महिन्यांच्या बाळाला ही महिला व्हेंटिलेटर लावून मुंबईच्या वाडिया रुग्णालयात लवकर कसं पोहोचता येईल याच्या विचारात होती. मात्र, दुर्दैवाने गीतांजली एक्सप्रेस ही तब्बल सात उशिराने मुंबईच्या दिशेने धावत होती.

आपल्या बाळाला कुठल्याही अडचणीविना सुखरूप कसं नेता येईल या विचारात असताना ऑक्सिजन पुरवठा करणारे तिन्ही सिलिंडर नाशिकपर्यंत देखील पुरणार नव्हते.

जळगाव स्थानकावरच दोन सिलिंडर संपले होते, तिसरे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त संपले होते. त्यामुळे बाळाचा ऑक्सिजन पुरवठा संपणार हे निश्चित होते. याचकाळात महिला रेल्वे प्रशासन, समोर येईल त्या व्यक्तीकडे जिवाच्या आकांताने माझ्या बाळाला ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून द्या अशी मागणी करत होती. पण मदत मिळत नव्हती.

या गाडीतून प्रवास करणाऱ्या डॉ. बुरुड यांनी महिलेचा रडण्याचा आवाज आणि दरवाज्याजवळ सुरू असलेला गोंधळ पाहिला. स्वतः बाळाची परिस्थिती पाहिली, ऑक्सिजन सिलिंडर नाशिकपर्यंत पुरेल की नाही याची शक्यता नव्हती, बारूड यांनी याबाबत मदत करायचा लागलीच निर्णय घेतला.

रेल्वेप्रवासात ऑक्सिजन संपल्यामुळे संकटात सापडलेलं 13 महिन्यांचं बाळ असं वाचलं

फोटो स्रोत, Pravin Thackeray

फोनवरुन थोडी चौकशी केल्यावर त्यांना कोरोना काळात अनेकांच्या मदतीला धावून गेलेल्या दीपक डोके यांच्या बाबत माहिती मिळाली, त्यांनी क्षणाचा विलंब न करता फोन करून या बाळाची माहिती दिली.

जिल्हा रुग्णालयात समोर करत नाशिकमधील ऑक्सिजन सेवा देणाऱ्यांच्या मदतीने मध्यरात्री डोके यांनी दोन ऑक्सिजन सिलिंडर नाशिकच्या रेल्वेस्थानकावर गीतांजली एक्सप्रेस येईपर्यंत हजर केले होते.

ते एक रुग्णवाहिका घेऊन स्वतः सिलिंडर पोहोचवण्यासाठी आले, थेट स्टेशनवर ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाले. ते ही एक मोठे आणि एक छोटे अधिकचे.

डॉ. हितेश बुरूड, दीपक डोके

फोटो स्रोत, Pravin Thackeray

फोटो कॅप्शन, डॉ. हितेश बुरूड, दीपक डोके

या प्रयत्नामुळे बाळाला होऊ शकत असलेला मोठा धोका टळला. डॉ. हितेश बुरूड, दीपक डोके यांच्या मदतीने बाळाचा जीव वाचल्याने बाळाच्या आईला अश्रू अनावर झाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)