गाडी शिकताना ब्रेकऐवजी एक्सलरेटरवर पडला पाय, माय-लेकींनी गमावला जीव

विहीरीतून बाहेर काढलेली गाडी.
फोटो कॅप्शन, विहीरीतून बाहेर काढलेली गाडी.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गाडी शिकत असताना एका महिलेचा ब्रेकऐवजी चुकून एक्सलरेटवर पाय पडल्यानं गाडी थेट विहिरीत पडल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात घडला आहे. या महिलेला तिचे पती गाडी शिकवत होते.

गाडीत यावेळी दाम्पत्यासोबत त्यांची मुलगीही होती.

या अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला असून, पतीवर दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती देऊळगाव राजाचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.

महिला आणि मुलीचा मृतदेह काढताना विहिरीत उडी घेतलेला युवक ही पाण्यात बुडाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. विहिरीत उडी मारणाऱ्या या युवकाचं नाव पवन पिंपळे असं आहे.

पवन पिंगळे

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, पवन पिंगळे

या घटनेतील तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

नेमकं घडलं काय?

अमोल मुरकुट हे जाफराबाद तालुक्यातील नळणी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. देऊळगाव राजा शहरातील रामनगर येथे वास्तव्याला असून कार शिकवण्यासाठी घरासमोरून निघाले.

नातेवाईकांनी फोडला टाहो
फोटो कॅप्शन, नातेवाईकांनी फोडला टाहो

त्यावेळी त्यांची पत्नी कार चालवत होती आणि मुलगी समोर व शिक्षक अमोल मुरकुट मागे बसलेले होते. कार सुरू करून कारसमोर आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी महिलेनं ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबल्यानं सुसाट वेगानं घराजवळ असलेल्या विहिरीत कार कोसळली.

ही विहीर 60 फूट खोल आहे.

कारचे दार उघडून शिक्षक पाण्याबाहेर आले असता नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्या हाताला मार लागल्यानं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय.

व्हीडिओ कॅप्शन, ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबला, नवऱ्याकडून गाडी शिकताना महिलेचा मुलीसह मृत्यू

देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अस्मा शेख यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "या घटनेतील पुरुषाच्या हाताला थोडासा मार लागला होता. त्यांना डिस्चार्च करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत आता स्थिर आहे. मृत महिला आणि मुलीचा मृतदेह जवळपास 8 तासांनंतर बाहेर काढण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहांवर आता पोस्टमोर्टम करण्यात येणार आहे. यासोबत त्यांना वाचवायला विहीरीत उडी मारलेल्या तरुणाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे."

वाचवण्यासाठी विहीरीत मारली उडी पण...

विहिरीजवळ उभ्या असलेल्या गर्दीतून शहरातील पवन तोताराम पिंपळे या 22 वर्षांच्या युवकाने कपडे काढून विहिरीत उडी घेतली. पण त्यानंतर तो खूप वेळ बाहेर आला नाही. तोही पाण्यात बुडाला.

देऊळगाव राजा अपघात

या घटनेतील तिन्ही मृतदेह आता बाहेर काढण्यात आलं आहे.

नातेवाईकांचा टाहो

ही घटना माहिती मिळताच स्वाती यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी एकच टाहो फोडला

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)