बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

महिला खेळाडू

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. BCCIचं महिला खेळाडूंना 'दिवाळी गिफ्ट'

भारतातल्या महिला क्रिकेटला नवं बळ मिळालं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गुरुवारी (27 ऑक्टोबर 2022 रोजी), महिला खेळाडूंना समान वेतन देण्याविषयी महत्त्वाची घोषणा केली.

जय शहा यांनी ट्वीट केलं आहे की भारताच्या 'करारबद्ध महिला खेळाडूंना' आता पुरुष खेळाडूंइतकीच मॅच फी (एका सामन्यासाठीचं वेतन) मिळणार आहे.

विषमता दूर करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे 'पहिलं पाऊल' असल्याचं सांगत ते म्हणाले की भारताच्या "महिला आणि पुरुष खेळाडूंना आता समान मॅच फी दिली जाईल, भारतीय क्रिकेटमध्ये लिंगसमानतेच्या एका नव्या युगात आपण जातो आहोत."

दहा दिवसांपूर्वीच बीसीसीआयनं वार्षिक सभेमध्ये पुढील वर्षी महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगचं (WIPL) आयोजन करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर शहा यांनी ही घोषणा केली आहे. या लिंकवर क्लिक करा आणि वाचा आता महिला खेळाडूंना किती रुपये फी स्वरुपात मिळणार?

2. महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या या प्रकल्पातून किती नोकऱ्या मिळाल्या असत्या?

'फॉक्सकॉन'नंतर 'टाटा-एअरबस'चा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला वडोदरामध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. भारतीय वायूदलासाठी मालवाहू विमान बवनण्याचा हा प्रकल्प 21,935 कोटी रूपयांचा आहे.

एअरबस

फोटो स्रोत, Getty Images

नागपूरमधील मिहान परिसरात हा प्रकल्प बनवण्यात येणार असल्याची चर्चा होती. "हा प्रकल्प नागपूर येथे होईल," असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं.

22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्याचंही ते म्हणाले होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातला होणार आहे. लिंकवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी..

3. म्युच्युअल फंडातले पैसे वापरून घर घेणं फायद्याचं आहे?

आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना त्यांची रिटायरमेंट पेन्शन मिळत नाही. दुसऱ्या बाजूला राहणीमानाचा खर्च मात्र वाढतच चाललाय.

म्युच्युअल फंड

फोटो स्रोत, Getty Images

अशा परिस्थितीत आपल्याला भविष्यासाठी काही गुंतवणूक करावी लागतेच. आता ही गुंतवणूक तुम्हाला महिन्याला मिळणाऱ्या पगारातून करायची आहे.

मात्र गुंतवणूकदार म्हणून पैसे कुठे गुंतवावे ही अडचण प्रत्येकाचीच असते. तर आज याच अडचणींवर उत्तर शोधूया. वाचा, म्युच्युअल फंडातले पैसे वापरून घर घेणं फायद्याचं आहे?

4. कांतारा सिनेमात दाखवलेला 'भूत कोला' काय आहे? त्यावरून वाद का सुरू आहे?

'कांतारा' सिनेमा सध्या सिनेरसिकांच्या चर्चेचा विषय आहे. अनेकजण उत्साहानं सोशल मीडियावर या सिनेमाबद्दल लिहितायेत. मूळचा कन्नड भाषेतील हा सिनेमा हिंदीसह इतर काही भाषांमध्येही प्रदर्शित झालाय. त्यामुळे देशभर सिनेमा पाहिला जातोय.

भूत कोला

फोटो स्रोत, FACEBOOK/SMITHA RAO

एकीकडे कांतारा सिनेमाबद्दल कौतुकाच्या प्रतिक्रिया बोलल्या-लिहिल्या जात असताना, दुसरीकडे सिनेमावरून वादालाही सुरुवात झालीय. सिनेमावरून म्हणण्यापेक्षा यातील 'भूत कोला' या प्रथेवरून.

कांतारा सिनेमात 'भूत कोला' नामक प्रथेचा उल्लेख करण्यात आलाय. किंबहुना, सिनेमाच्या कथेच्या केंद्रस्थानी ही भूत कोला प्रथा आहे. पण ही प्रथा नेमकी काय आहे?

5. ट्विटर इलॉन मस्क यांनी खरेदी केलं, पराग अगरवालांची नोकरी गेली

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सला ट्विटर विकत घेतलं आहे. या वृत्तानंतर ट्विटरचे मुख्य अधिकारी आणि वित्तीय अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांची नोकरी सोडली आहे.

पराग अगरवाल

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, पराग अगरवाल

इलॉन मस्क यांनी आधी ट्विटरला विकत घेण्याची ऑफर दिली होती, पण नंतर ती मागे घेतली. त्यानंतर ट्विटरनं कायदेशीर कारवाई करत मस्क यांना ट्विटर विकत घेण्यास भाग पाडलं आहे. आता हा व्यवहार पूर्ण झाल्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.

पैसै कमावण्यासाठी ट्विटर विकत घेत नसल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकन मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार ट्विटरचे मुख्य अधिकारी पराग अगरवाल आणि मुख्य वित्त अधिकारी नेद सेगल आता कंपनीमध्ये कार्यरत नसतील. वाचा संपूर्ण बातमी..

बीबीसी मराठाचे हे 5 व्हीडिओ तुम्ही नक्की पाहायला हवेत -

1. एकनाथ शिंदे सरकारला 50 खोक्यांचा आरोप जड जातोय का?

व्हीडिओ कॅप्शन, 50 खोक्यांचा आरोप एकनाथ शिंदे सरकारला जड जातोय का?

2. कांतारा चित्रपटातील 'भूत कोला' नक्की काय? त्यावरुन वाद का रंगला?

व्हीडिओ कॅप्शन, कांतारा चित्रपटातील 'भूत कोला' नक्की काय? त्यावरुन वाद का रंगला?

3. सणासुदीला प्लास्टिकच्या फुलांना मागणी, खरी फुलं विकताना शेतकऱ्यांचे हाल

व्हीडिओ कॅप्शन, सणासुदीला प्लास्टिकच्या फुलांना मागणी, खरी फुलं विकताना शेतकऱ्यांचे हाल

4. भारतीय नोटांवर महापुरुषांच्या फोटोंची मागणी राज्यातून का होतेय?

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय नोटांवर महापुरुषांच्या फोटोंची मागणी राज्यातून का होतेय?

5. ऋषी सुनक यांचं मराठी कनेक्शन असं आहे..

व्हीडिओ कॅप्शन, यूकेचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक कोण आहेत? त्यांचं मराठी कनेक्शन काय आहे?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)