You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुबईच्या राजघराण्यातील आणखी एका महिलेचं बंड, संयुक्त राष्ट्रांकडे छळाची केली तक्रार
दुबईच्या शासकांच्या एका कुटुंबीयाने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत एक अर्ज दाखल केला आहे. संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून जैनब जवादली आणि त्यांच्या मुलांचं रक्षण करावं अशी मागणी केली आहे.
संयुक्त राष्ट्रात अपील केल्याप्रमाणे जैनब जवादली यांना दुबईत विविध प्रकारच्या छळाला तोंड द्यावं लागत आहे आणि त्यांना धमक्या येत आहेत.
जवादली दुबईच्या शाही परिवाराची सदस्य आहे. त्या शेख सईद बिन मकमूद बिन रशीद अल मकदूम यांची पत्नी आहे.
या दोघांचा घटस्फोट झाला आहे. मुलाच्या ताब्यावरून सध्या त्यांच्यात भांडणं चालू आहेत.
बीबीसीच्या हाती लागलेल्या एका व्हीडिओमध्ये जवादली म्हणतात, "प्लीज माझी मदत करा. मी आणि माझी मुलं संकटात आहोत. आम्हाला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे मला बेघर केल्यासारखंच आहे."
माझी मुलं निर्भयपणे बाहेर फिरू शकत नाही. कारण त्यांच्या अपरोक्ष मला अटक केली जाईल अशी त्यांना भीती वाटते.
31 वर्षीय जवादली अझरबैजानच्या आहेत. त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जिमनॅस्ट आहेत. 2019 मध्ये त्यांनी शेख यांच्यापासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर त्या दुबईतच राहत आहेत.
जवादली यांना दुबई सोडायचं नाही कारण त्यांना भीती वाटते की एकदा त्यांनी देश सोडला तर त्यांना मुलींना त्यांना कधीही भेटता येणार नाही.
तीन वर्षांपासून त्या मुलींच्या कस्टडीसाठी कोर्टात लढत आहेत.
या दोघांचा विवाह 2015 मध्ये झाला होता. शेख सईद हे सत्तारुढ राजघराण्यातले एक वरिष्ठ सदस्य आहे. लग्नानंतर हे दाम्पत्य दुबईतच राहिलं.
शेख सईद हे दुबईचे शासक मोहम्मद बिन राशिद अल मकदुम यांचे पुतणे आहेत.
संयुक्त राष्ट्रांकडे केलेल्या अपीलमध्ये जवादली यांच्या वकिलाने सांगितलं की त्यांच्या अशिलाला बोलण्यावर आणि स्वातंत्र्यावर बंधनं घातली आहेत. तसंच त्यांना धमक्याही येत आहेत.
दुबई पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी जवादिल आणि त्यांच्या कुटुंबियांना हॉटेलमधून जाऊन मारहाण केली होती.
जवादली यांनी या घटनेचं सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारण केलं होतं.
या घटनेने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता जवादली यांचे आईवडील अझरबैजानला परत आले आहेत.
गेल्या तीन वर्षांत घरावर छापे, न्यायालयाकडून समन्स आणि अटकेचं वॉरंट जवादली यांच्यासाठी नित्याच्या बाबी झाल्या आहेत.
पन्नास पानाच्या या अपिलात त्यांनी आरोप लावला आहे की त्यांच्यावरचा खटला निष्पक्षपणे चालवला जात नाही. तसंच शेख सईद यांना कोणत्याही प्रक्रियेशिवाय मुलींची कस्टडी देण्याची प्रक्रिया केली आहे.
अपीलामध्ये दावा केला आहे की त्यांच्याबरोबर भेदभाव होत आहे.
जवादली यांच्या मते त्यांच्या बाजूने निर्णय आला होता मात्र काही दिवसांच्या आत तो परत घेण्यात आला आहे.
शाळेत पाठवण्यावरून वाद
तिथे शेख सईद यांच्यातर्फे खटला लढवणाऱ्या वकिलांनी दावा केला आहे की जवादली एक अनफिट आई आहे. त्या त्यांच्या मुलींना शाळेत पाठवत नाहीत.
त्या अतिशय असुरक्षित ठिकाणी राहतात. त्यामुळे त्यांच्या लहान मुलीच्या जिवाला धोका आहे.
जवादली यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे. त्यांच्या या युक्तिवादाच्या समर्थनार्थ कागदपत्रं ही सादर केली आहेत.
जवादली सध्या त्यांच्या मुलीला शाळेत पाठवत नाहीयेत. त्यांना भीती आहे की शाळेत पाठवलं तर त्यांना घरी परतता येणार नाही.
शाळेने जवादली यांच्याशी मीटिंग करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची विनंती केली आहे.
जवादली यांच्या वकिलाच्या मते शेख मकदूम यांना न्यायालायच्या आदेशानुसार मुलांचा ताबा दिला जाऊ शकतो.
दुबईतील न्यायलयीन प्रक्रिया जवळून पाहणाऱ्या एका व्यक्तीने बीबीसीला सांगितलं की जवादिली जे सांगत आहे त्या भूतकाळातील एका खटल्याकडे इशारा करत आहेत. याआधीसुद्धा शाही परिवारातील सदस्यांच्या पत्नींबरोबर असे प्रकार झाले आहेत.
सुनांच्या छळवणुकीचं दुबईमधलं हे पहिलं प्रकरण नाही
दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकदूम यांची माजी पत्नी प्रिंसेस हया 2019 मध्ये देश सोडून गेल्या होत्या. दुबईमध्ये त्यांच्या जिवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यावर्षी ब्रिटनच्या एका कोर्टाने त्यांच्या दोन मुलांची कस्टडी सोपवली आहे.
त्यानंतर शेख मोहम्मद यांची मुलगी प्रिंसेस लतीफा यांची अतिशय गुंतागुतींची कहाणी जगासमोर आली होती.
प्रिंसेस हया यांनी एकदा स्वत:ला शाही परिवारातून सोडवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या बोटीने त्या प्रवास करत होत्या ती हिंद महासागरात पकडली गेली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा बळजबरीने दुबईत आणण्यात आलं होतं.
त्यानंतर हया यांनी अनेक व्हीडिओ जारी केले आणि सांगितलं की त्यांना इच्छेविरुद्ध बंदी ठेवण्यात आलं आहे.
नंतर त्या क्वचितच सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. आता त्या म्हणतात की त्या स्वेच्छेने दुबईत राहत आहेत.
बीबीसीने या संपूर्ण प्रकरणात संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मागितली. मात्र त्यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)