बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @ASHWINIVAISHNAW

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी...

1. भारतात 5G सेवा सुरू, पण तुमचं-आमचं आयुष्य किती वेगाने धावणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात भारतात 5G मोबाइल इंटरनेट सेवा सुरू केली. यासोबतच भारतात आता वेगवान असं मोबाईल इंटरनेटचं युग सुरू झालं असल्याचं म्हटलं.

सर्व भारतीयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे, असं 5G सेवेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम आणि हैदराबाद या भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मार्च 2023 पर्यंत देशातील सर्व शहरी भागात 5G सेवा सुरू होईल, असं भारती एअरटेलचं म्हणणं आहे. भारताच्या माहिती मंत्रालयानुसार, 2035 पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेवर 5G चा प्रभाव 450 अरब डॉलर पर्यंत असेल. जाणून घ्या, 5G च्या आगमनानंतर आपलं आयुष्य कसं बदलेल?

2. स्त्रीशक्तीची उपेक्षा- 'या' पदांवर अद्याप कधीही महिलांची वर्णी लागली नाही

नवरात्रोत्सव नुकताच पार पडला. त्यानिमित्तानं स्त्रीशक्तीचं कौतुकही अनेक माध्यमांतनं होताना दिसलं. त्यातून आपल्या देशात, समाजात, ज्यानं एकेकाळी अनेक पातळ्यांवरच्या स्त्री-पुरुष असमानतेपासून सुरुवात केली होती, त्यानं ती हटवण्यामध्ये किती पल्ला गाठला आहे हेही समजतं.

महिला, राजकारण, उद्योग, न्याय, प्रशासन

फोटो स्रोत, Jasper James

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

यशस्वितेची जी उदाहरणं या निमित्तानं गौरवास पात्र ठरतात त्यानं हेही पुन्हा एकदा सिद्ध होतं की कर्तृत्वाला संधी मिळाली की तिथं कोणताही भेद रहात नाही.

हे कर्तृत्व समजून घेण्याचा एक मार्ग हाही असू शकतो की आपल्या समाजातली, राजकीय-प्रशासकीय व्यवस्थेतील किती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता आधुनिक झालेल्या समाजानं स्त्रियांकडे सोपवल्या आहेत?

3. जेवणातून चपाती-भात पूर्णपणे बंद केले तर काय फायदे होतात? या पदार्थांना पर्याय काय?

दररोज घरचे जेवण जेवून कंटाळा आल्यामुळे मी आमच्या ऑफिसच्या बाजूलाच ओळीने असलेल्या खाण्यापिण्याच्या स्टॉल्सवर गेले. पहिल्या दुकानात नूडल्स आणि मंचुरियन मिळत होते.

सकस आहार

फोटो स्रोत, Getty Images

तिथून थोडे पुढे गेल्यावर गरमागरम वडा-पाव मिळत होता. कार्बोहायड्रेट्सचा एवढा मारा नको म्हणून पुढच्या स्टॉलवर गेले. तिथे एका कढईत भरपूर तेलात केलेला फ्राइड राइस दिसला. तेल आणि भात, म्हणजे दोन्ही धोकादायक, असं मी मनात म्हणाले.

नान, पुरी, कुल्चा, कचोरी हे सगळे पदार्थ तर मैद्याचे आहेत आणि तेही तळलेल्या बटाट्यासोबत खायला देत आहेत. मी कोणत्याही दिशेला गेले तरी सगळीकडे कार्बोहायड्रेट्सच दिसत होते. प्रोटीन्स कुठेच नाहीत.

4. 'पिक्चर आहे की व्हीडिओ गेम, कार्टून चॅनेलवर दाखवा'; आदिपुरुषच्या टिझरचं जोरदार ट्रोलिंग

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचा टिझर रविवारी रात्री प्रदर्शित झाला.

या सिनेमात व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च करण्यात आला. परंतु टिझर पाहून नेटिझन्सची निराशा झाली आणि मीम्सना उधाण आलं.

आदिपुरुष

फोटो स्रोत, Om Raut/Twitter

चित्रपटाची संपूर्ण टीम या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्यामध्ये पोहोचली होती. दिग्दर्शक ओम राऊत यांनी लोकमान्य टिळकांवर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

ओम यांनी दिग्दर्शित केलेल्या तान्हाजी चित्रपटाला 68व्या व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार मिळाला.

5. दृष्ट खरंच लागते का, अनेक सेलिब्रिटी 'निळा डोळा' का वापरत आहेत?

आपल्याकडे आजी पणजी अशा म्हाताऱ्या बायका आजही मीठ मिरच्यांनी दृष्ट काढतात. कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून केलेला हा प्रकार तसा अंधश्रद्धेचाच एक भाग असतो. पण आताच्या आधुनिक काळात या वाईट नजरेपासून बचाव व्हावा म्हणून नवनवीन लॉकेट, ब्रासलेट, नजर सुरक्षा कवच यंत्र अशा अनेक जाहिराती आपण पाहतो.

नजर

फोटो स्रोत, Alamy

यात एक साधर्म्य दिसतं ते म्हणजे 'डोळा' या आकृतीचं. अमेरिकन मॉडेल जीजी हदीद असो वा किम कार्दशियन या दोघींच्याही गळ्यात तुम्हाला हे डोळ्यांचं लॉकेट दिसतं.

हा डोळा म्हणजे प्राचीन इजिप्तमधील संरक्षण, शाही शक्ती आणि चांगल्या आरोग्याचं प्रतीक म्हणून धारण केला जातो. हा डोळा असतो घोड्याचा. याला 'शैतानी आँख' असंही म्हटलं जातं.

बीबीसी मराठीचे व्हीडिओ, जे तुम्ही नक्की पाहायला हवेत -

1. मुलांना लैंगिक शिक्षण देतांना 'या' गोष्टी लक्षात ठेवा..

व्हीडिओ कॅप्शन, मुलांसोबत सेक्सविषयी संवाद साधताना नेमकं काय आणि कसं बोलावं?

2. तेलंगणातील या नेत्याने कोंबडी आणि दारू का वाटली?

व्हीडिओ कॅप्शन, तेलंगाणा राष्ट्र समितीच्या या नेत्याने कोंबडी आणि दारू का वाटली?

3. रावणदहन कार्यक्रमात रावणाचा जळता पुतळा लोकांवर कोसळला

व्हीडिओ कॅप्शन, युमनानगरमध्ये दसऱ्यानिमित्त रावणदहनाच्या कार्यक्रमात रावणाचा जळता पुतळा कोसळला

4. इंडोनेशियात फुटबॉलच्या मैदानात 125 जणांचा मृत्यू कशामुळे झाला?

व्हीडिओ कॅप्शन, इंडोनेशियामध्ये 01 ऑक्टोबर रोजी फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली.

5. चांदणी चौकात स्फोट झाला, पण पूल पूर्णपणे का कोसळला नाही?

व्हीडिओ कॅप्शन, पहिल्या प्रयत्नात पूल पूर्णपणे का कोसळला नाही, याची आता चर्चा होते आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)