बिग बॉस 16 : #Metooचे आरोप असलेला साजिद खान बिग बॉसच्या घरात, वादाला फुटलं तोंड

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मधू पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
बिग बॉसच्या 16 व्या सीझनची सुरुवात झाली आहे. अनेक टीव्ही कलाकारांनी त्यात सहभाग घेतला आहे. दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचे भाऊ साजिद खान यावेळी बिग बॉसमध्ये दिसणार आहे.
अभिनेता-दिग्दर्शक साजिद खान कायम वादग्रस्त राहिले आहेत. 2018 मध्ये #Metoo चळवळीच्या वेळी साजिद खान यांच्यावर गंभीर आरोप होते. त्यानंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन ने त्यांच्यावर बंदी घातली होती.
त्यांच्याविरुद्ध अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सने आवाज उठवला होता. त्यामुळे हाऊसफुल 4 या त्यांच्या पिक्चरमधून त्यांना त्यांचं नाव काढावं लागलं होतं. गेले तीन वर्षं त्यांच्या नावावर कोणताच प्रोजेक्ट नाही. पण बिग बॉसमध्ये आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेतय.
बिग बॉसमध्ये त्यांचा समावेश केल्याने शोच्या निर्मात्यांवर सडकून टीका होत आहे. #Metoo सारखे गंभीर आरोपांकडे कसं दुर्लक्ष करू शकतात असा प्रश्न विचारला जात आहे.
गायिका सोना मोहपात्रा यांनी साजिद खान यांनी या निर्णयावर टीका केली आहे. एका ट्वीट मध्ये त्या म्हणतात. साजिद खान एका टीव्ही रिअलिटी शो मध्ये दिसणार आहे. अनू मलिक आणि कैलाश खेर सुद्धा एका सो मध्ये जज म्हणून दिसत आहेत. या सगळ्यांविरुद्ध आरोप आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
प्रसिद्ध अँकर आणि सोशल मीडिया क्रिएटर जेनिस सिक्वेरा यांनी सुद्धा या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, "साजिद महिलांबरोबर गैरवर्तन करायचा. कास्टिंगच्या नावावर नग्न फोटो पाठवायला सांगाया. स्टाफला पॉर्न व्हीडिओ दाखवायला सांगायचे. यामुळेच हे लोक स्पर्धक होतात.'
दुसरीकडे काश्मिरा शाह यांनी ट्वीट करून साजिद यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, साजिद खानला एक संधी द्यायला हवी.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बिग बॉस13 च्या स्पर्धक शहनाज गिलने म्हटलं की, साजिद खान यांच्यासाठी मी खूश आहे. त्या म्हणाल्या की त्यांनी लोकांना हसवलं आहे. तुम्ही तिथेही लोकांना हसवा, कोणाशी भांडू नका.
साजिद खान यांनी बिग बॉसच्या घरी जाण्याधी सलमान खान शी बोलताना हाऊसफुल-4 चं क्रेडिट त्यांच्यापासून कसं हिरावून घेतलं हे सांगितलं होतं. #Metoo चळवळीचा त्यांनी उल्लेखही केला नाही. मात्र ते म्हणाले लोक त्यांच्या अपयशामुळे बर्बाद होतात मी माझ्या यशामुळे झालो आहे.
साजिद खानचं करिअर
साजिद खान यांनी डरना जरुरी है, हे बेबी, हाऊसफुल, हाऊसफुल 2 सारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
त्यांचे हमशकल आणि हिम्मतवाला सर्वांत जास्त फ्लॉप झाले होते. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ते सगळ्यात फ्लॉप चित्रपट आहेत.
हिम्मतवाला फ्लॉप झाल्यानंतर अजय देवगण आणि साजिद खान दुरावले आहेत.
साजिद खान फराह खान यांचा छोटा भाऊ आहे. साजिद सहा वर्षांचे असताना त्यांचे आई वडील वेगळे झाले होते.

फोटो स्रोत, StERDEL
साजिद आणि फराह यांचे वडील कामरान खान फिल्ममेकर होते. ते सतत दारू प्यायचे, त्यातच त्यांचं लिव्हर खराब झालं आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी साजिद 14 वर्षांचे होते. दोघंही बहीण भाऊ गरिबीत मोठे झाले आणि महत्प्रयत्नाने बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं. साजिद खान पेक्षा जास्त नाव फराह खान यांनी कमावलं. अभिनेत्री हनी इरानी आणि डेझी इरानी साजिद आणि फराह खान यांची काकू आहे.
साजिद खान जेव्हा कॉलेज मध्ये होते तेव्हा ते पार्टीत डीजेचं काम करायचे. त्यानंतर ते एका टीव्ही शो मध्ये होस्ट होते.
1995 मध्ये त्यांनी 'मै भी डिटेक्टिव्ह' मध्ये होस्ट होते. त्यानंतर इक्के पे एक्का हा शो होस्ट केला होता. तो सगळ्यात जास्त चालणारा शो म्हणून त्याची लिमका बूक मध्ये नोंद आहे.
साजिद खान यांनी इंडियाज गॉट टॅलेंट आणि नच बलिए पाचव्या आणि सहाव्या सीझनचा शो जज केला. तसंच झुठ बोले कौआ काटे, मै हुं ना, मुझसे शादी करोगी अशा चित्रपटात काम केलं आहे.
जितकं त्यांचं नाव झालं तितकंच ते बदनामही झाले. त्यांच्या वक्तव्यामुळे ते अनेकदा चर्चेत होते. बरेचदा त्यांनी दुसऱ्या दिग्दर्शकांवर शेलक्या शब्दात टीका करून नाराजी ओढवून घेतली.
#Metoo मोहिमेनंतर साजिद खानच्या करिअरला मोठा धक्का बसला. सलोनी चोपडा, प्रियंका बोस, आहना कुमार, मंदना करीमी यांच्यासारख्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
अभिनेत्री बिपाशा बासूने साजिद यांचं वागणं विचित्र असल्याचं सांगितलं होतं. ते घाणेरडे जोक्स मारत असल्याचं तिनं म्हटलं होतं. दिया मिर्झाने ही साजिद खान यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. एकूण नऊ महिलांनी त्यांच्यावर आरोप लावले होते.

फोटो स्रोत, STR
ज्येष्ठ पत्रकार अजय ब्रह्मात्मज यांच्यामते, "साजिद खान हे काही फार थोर दिग्दर्शक नाहीत. विनोदी स्वभावाने त्यांन काही शो जिंकले. डायरेक्टर म्हणून त्याचा 'हाऊसफुल' चित्रपट आला होता. तो ठीकठाक होता. हमशकल वाईट पिक्चर होता. इंडस्ट्रीने त्यांना फारसं मानलं नाहीच कधी. प्रेक्षकांना ते आवडायचे."
#Metoo चळवळीबद्दल ते म्हणाले की या चळवळीत ज्यांच्यावर आरोप लागले ते त्यातून वाचू शकले नाहीत. साजिद खान यांचं करिअर तसंही फारसं मोठं नाही. बिग बॉसमध्ये तसंही अशा वादग्रस्त लोकांनाच बोलावतात. तो याच आधारावर सुरू आहे. काही लोकांना शो मधून काढून टाकल्याचंही पाहिलं आहे.
आता ते या शो मध्ये काय करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























