बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी...

1. गर्भपाताचा अधिकार प्रत्येकीचाच, महिला विवाहित असो की अविवाहित - सुप्रीम कोर्ट

सर्वच महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 24 आठवड्यापर्यंत अविवाहित महिला गर्भपात करू शकतात असंही कोर्टाने म्हटलं. अविवाहित महिलांच्या गर्भपाताशी निगडीत प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं आहे.

न्या. डी. वाय. चंद्रचूड एका सुनावणीदरम्यान म्हणाले, "जसा समाज बदलतो तसे नियम बदलतात. त्यामुळे कायदासुद्धा लवचिक असायला हवा. असुरक्षित गर्भपात थांबवता येतो. मानसिक स्वास्थ्याविषयी आपल्या जाणिवा रुंदावण्याची गरज आहे. गरोदर महिलांच्या अधिकारांचा विचार व्हायला हवा. विवाहित बायकांवर सुद्धा त्यांचा नवरा बलात्कार करू शकतो."

"कोणतीही महिला विनासंमतीने ठेवलेल्या लैंगिक संबंधातून गरोदर होऊ शकते. लग्नामुळेच एखाद्याला अधिकार मिळतो हा समज दूर व्हायला हवा. जर एखादी महिला विवाहित नसेल तर तिचा गर्भपाताचा अधिकार संपत नाही"हे अधिकार लग्नात दिले जातात. हे बदलायला हवं. आता समाजाचे रीतिरिवाज बदलायला हवेत. जेणेकरून ज्यांचं कुटुंब नाही त्यांनाही त्याचा फायदा घेता यायला हवा."

दरम्यान, गेल्यावर्षी भारतीय संसदेने वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक मंजूर करत काही विशिष्ट परिस्थितीत गर्भपाताचा कालावधी वाढवला होता. या कायद्यात काय म्हटलं होतं हे जाणून घेऊ..

2. इलेक्ट्रिक वाहन विकत घ्यायचंय? या 4 गोष्टी विचारात घ्या..

टाटा मोटर्सने आपली आजवरची सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टियागो EV ही देशातली पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे, आणि हिची किंमत 8.5 लाखांपासून 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे. ही गाडी नक्कीच अनेकांचं इलेक्ट्रिक वाहन घेण्याचं स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते.

विविध दुचाक्या, तीनचाकी रिक्षा आणि चार-चाकी कार्स, अशा सर्वच इलेक्ट्रिक वाहनांची (EV) ही बाजारपेठ झपाट्याने वाढतेय. 2020-2021 या आर्थिक वर्षात एकूण 1,34,463 EV विकल्या गेल्या होत्या. हा आकडा 2021-2022 मध्ये तिपटीने वाढून 428,213 वाहनांवर गेला आहे.

या आकड्यांमध्ये मोठा वाटा हा दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा असला, तरी इलेक्ट्रिक कार्सचा खासगी वापरही वाढू लागला आहे. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा विचार करत असाल तर या चार प्रश्नांचा आधी विचार करा -

3. नेहा कक्कडच्या रिमिक्सवर नाराज झालेल्या 'गरबा क्वीन'बद्दल हे माहितीये?

फाल्गुनी पाठकचं नाव घेतलं की अनेकांना 90च्या दशकातील चुडी जो खनके हाथो में , तूने पायल है छनकाई, मेरी चुनर उड उड जाए यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी आठवतील.

तिच्या या गाण्यांनी अनेक मुलींच्या मनात प्रेमाची हळूवार भावना निर्माण झाली. फाल्गुनी पाठकने आपल्या मधुर आवाजाने, गाण्यांनी केवळ लोकांच्या मनावर राज्य केलं नाही; तर आपल्या हटके स्टाईल स्टेटमेंटने तिने समाजातील 'जेंडर नॉर्म्स'ही मोठ्या धाडसाने चॅलेंज केले.

नवरात्र आले की 'गरबा क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनीची सगळ्यांनाच आठवण येते. पण यावेळी नवरात्रीच्या आधीच फाल्गुनी पाठक चर्चेत आली आहे.

खरंतर फाल्गुनी पाठकने नेहमीच स्वतःला वाद-विवादांपासून दूर ठेवलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच नेहा कक्कड आणि फाल्गुनी यांच्यातील वादाच्या बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जाणून घ्या, गरबा क्विन फाल्गुनी पाठकविषयी सर्वकाही या लेखातून..

4. 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा 'महाराज' क्रिकेटपटू

भारत दौऱ्यावर आलेल्या विदेशी खेळाडूने 'जय माता दी' म्हणत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तर! असं घडलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. पहिला ट्वेन्टी-20 सामना आज तिरुवनंतपुरम इथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने पारंपरिक धोती वेशात तिरुवनंतपुरम इथल्या पद्मनाभन मंदिराला भेट दिली.

दर्शन झाल्यानंतर केशवने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. 'जय माता दी' असं लिहून केशवने भारतीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. भारतात साजरा होणाऱ्या सणाच्या शुभेच्छा पाहुण्या संघातील खेळाडूने दिल्याने सोशल मीडियावर केशव महाराजचं नाव चर्चेत आहे.

5. अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA हेरगिरीसाठी कबुतरांचा असा करायची वापर

18 सप्टेंबर 1947 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांनी राष्ट्रीय सुरश्रा कायदा 1947 वर शिक्कामोर्तब केले नि जगातील सर्वांत शक्तिशाली अशा Central Investigation Agency किंवा CIAचा जन्म झाला.

तेव्हापासून शीतयुद्धादरम्यान वापरण्यात येणाऱ्या अनेक गुप्त पद्धतींचा खुलासा अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIAने केलाय. कबुतरांना कशा प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांचा हेरगिरीसाठी वापर करण्यात यायचं, हे CIAने सांगितलंय.

सोव्हिएत संघामधल्या संवदेनशील भागांमध्ये जाऊन तिथले फोटो गुप्तपणे क्लिक करण्याचं प्रशिक्षण या कबुतरांना देण्यात यायचं. एखाद्या खिडकीजवळ जाऊन उपकरण कसं ठेवायचं, हे देखील कबुतरांना शिकवण्यात यायचं, असं CIAने सांगितलंय. कबुतरांसोबतच डॉल्फिन्सचाही अशाचप्रकारे हेरगिरीसाठी वापर करण्यात येई.

गुप्तचर संस्थेने हाती घेतलेली मोहीम यशस्वी करण्यासाठी या प्राण्यांची मोठी मदत झाल्याचं CIAचं म्हणणं आहे. पण CIA संस्था कबुतरांचा हेरगिरीसाठी वापर नेमका कशा पद्धतीने करायची?

बीबीसी मराठीचे व्हीडिओ, जे तुम्ही नक्की पाहायला हवेत -

1. नासाने आपलं अंतराळयान जाणूनबुजून या लघुग्रहावर का आदळवलं?

2. नदीत बोट बुडाल्यानंतर प्रवासीही बुडू लागले आणि...

3. मुंबईची दहिसर नदी आणि नदीकाठची माणसं त्यांच्या जगण्याची गोष्ट

4. शेकडो गाड्यांमधून लोक रशिया सोडतायत, कारण..

5. पाकिस्तान पूर : या गावात लोक कढईत बसून मासेमारी करू लागलेत

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)