You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC Marathi : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी..
1. केवळ 'बॉयकॉट'च्या ट्रेंडमुळे बॉलिवुडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत?
अलीकडेच आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा, तर अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे बिग बजेट सिनेमे रिलीज झाले. मध्यंतरी बॉलिवुडचे सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडाधड आपटत होते.
त्यामुळे संबंध बॉलीवुडची नजर या दोन्ही चित्रपटांच्या कमाईकडे लागली होती. पण यावेळेसही बॉलिवुडच्या पदरी निराशाच पडली.
लाल सिंह चढ्ढाने पहिल्याच दिवशी 11.50 कोटींचं ओपनिंग मिळवलं, तर अक्षयच्या रक्षाबंधनने 8 कोटींची कमाई केली.
पुढे सलग चार दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे चित्रपट चालतील अशी अपेक्षा होती, पण काही बिझनेस झालाच नाही.
चित्रपटांची ही अशी अवस्था पाहून निर्मात्यांना टेन्शन आलंय. पण असं का घडतंय?
2. 'हर घर तिरंगा' मोहिमेत लावलेल्या कोट्यवधी झेंड्यांचं आता काय होईल?
13 ते 15 ऑगस्टदरम्यान तुम्हीसुद्धा आपल्या घरी, कार्यालयात, कार किंवा बाईकवर भारताचा झेंडा लावला असेल.
खरं तर भारतात 15 ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा लावण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. पण यंदाच्या वर्षी गोष्ट जरा वेगळी होती.
यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट असे एकूण 3 दिवस झेंडा लावण्याचं आवाहन देशवासियांना केलं होतं. या मोहिमेला 'हर घर तिरंगा' असं नाव देण्यात आलं.
कॉनफेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत देशभरातील व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या आकारांचे सुमारे 30 कोटी झेंडे विकले. झेंड्यांचा एकूण व्यवसाय सुमारे 500 कोटी रुपयांचा झाल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
इतक्या झेंड्यांची विक्री झाली आहे, तर त्यांना सांभाळून ठेवणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण, तिरंगा झेंडा हा प्रत्येक भारतीयाच्या आन-बान-शान चं प्रतीक आहे.
3. राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' का म्हणायचे?
शेअर मार्केटमधील सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज (14 ऑगस्ट) निधन झालं. ते 62 वर्षांचे होते.
मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांच्या 'आकासा एअर'ची सुरूवात झाली होती.
2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या स्थापनेनंतरची ही पहिली नवीन एअरलाईन आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मीडिया आणि सोशल मीडियात या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती.
4. चीनचं हेरगिरी जहाज 'युआन वांग-5' श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात, भारताचा तीव्र आक्षेप
भारताने चिंतापूर्ण आक्षेप व्यक्त केला असतानाही चीनचं उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्याला वाहिलेलं 'युआन वांग-5' हे जहाज श्रीलंकेतल्या हंबनटोटा बंदरात दाखल झालं आहे.
भारताने यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. मात्र भारताच्या आक्षेपाला बाजूला सारत श्रीलंकेने चीनच्या या जहाजाला आपल्या देशात येण्याची परवानगी दिली आहे.
युआन वांग-5 हे जहाज 16 ते 22 ऑगस्ट या कालावधीत हंबनटोटा बंदरात नांगर टाकून डेरेदाखल असेल, असं श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेच स्पष्ट केलं आहे.
5. तुम्हाला अजूनही कोव्हिड झाला नसेल तर 'ही' आहेत त्याची 5 कारणं
तुमच्या आसपास, नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये एखादी व्यक्ती तरी असेलच जिला आजवर कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं नाही.
तुम्हाला कदाचित वाटू शकतं की एकतर त्यांच्यात सुपरपावर आहे किंवा त्यांनी व्यवस्थित रितीने कोव्हिड टेस्टच केलेली नाही.
पण एक शक्यता अशीही आहे की ते फारच नशीबवान आहेत किंवा त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)