You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रायगडजवळ शस्त्रांनी भरलेल्या बोटीचं गूढ, पोलिसांकडून चौकशी सुरू
रायगडच्या हरिहरेश्वरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झालेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून रायगड जिल्ह्यातील अलर्ट देण्यात आला आहे.
या बोटीत तीन AK-47 रायफल आणि काही काडतूसं मिळाली आहेत. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
गुरूवारी (18 ऑगस्ट) सकाळी स्थानिक नागरिकांना ही संशयास्पद बोट आढळून आली. त्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली.
समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्यामुळे दोरीच्या सहाय्याने ही बोट खेचून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिेष्ठ पोलीस अधिकारी चौकशीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या बोटीवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत बोटीत एक काळ्या रंगांचा बॅाक्स आढळून आलाय. यात तीन AK-47 आणि काडतूसं आहेत.
महाराष्ट्र एटीएस, रायगड पोलीस आणि केंद्रीय तपासयंत्रणांनी याची चौकशी सुरू केली आहे.
या बोटीवर नेप्चुन मॅरिटाईम सिक्सुरीटी असं लिहिण्यात आलंय. बोट किनाऱ्याजवळ आढळून आली तेव्हा या बोटीवर कोणीही नव्हतं अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
विधानसभेत प्रतिक्रिया
हरिहरेश्वर सापडलेल्या या बोटीचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत. आमदार आदिती तटकरे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
"या संपूर्ण प्रकरणात एक सविस्तर टीम नेमली पाहिजे. केंद्रीय यंत्रणांची गरज लागली तर त्यांची मदत घेतली पाहिजे. सध्या चौकशी अत्यंत प्राथमिक आहे. रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष संस्था अस्तित्वात आहे. माझी अशी मागणी आहे की त्यांची मदत घ्यावी. तशी विनंती आम्ही सरकारला केली आहे."
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही वेळात सभागृहात या प्रकरणी निवेदन करणार आहे. एटीएस प्रमुख रायगडला रवाना झाले आहेत.
सदर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि एटीएस करत आहे. कोस्टगार्ड आणि इतर संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे. अजून पूर्ण माहिती नसली तरी सगळीकडे नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय यंत्रणा आमच्या संपर्कात आहे असं निवेदन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं आहे.
या बोटीचं नाव लेडीहान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लाँडरन यांची आहे. या महिलेचा नवरा जेम्स हॉबर्ट या बोटीचा कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपला जाणार होती.
दिनांक 26 फेब्रुवारी ला सकाळी 10 वाजता बोटीचं इंजिन निकामी झालं आणि खलाशांनी मदतीचा कॉल दिला. त्याच दिवशी 1 वाजता कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्त केलं समुद्र खवळलेला असल्याने लेडीहान बोटिंगचं टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ही बोट भरकटत रायगडच्या किनारी आली अशी माहिती भारतीय कोस्ट गार्ड ने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)