राजू श्रीवास्तव अजून शुद्धीवर आलेले नाहीत- कुटुंबीय

फोटो स्रोत, facebook
राजू श्रीवास्तव यांना अद्याप शुद्ध आलेली नाही असं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.
ते अजून शुद्धीवर आलेले नाहीत, परंतु त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे, असं त्यांची मुलगी अंतराने स्पष्ट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एम्सचं मीडिया अकाऊंट, आपल्या वडिलांचं अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील माहितीवर विश्वास ठेवा, कारण तिथलीच माहिती सत्य आहे. इतर कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं अंतरा यांनी सांगितलं आहे.
सध्या राजू यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
राजू यांच्यावर बुधवारी (10 ऑगस्ट) अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
राजू श्रीवास्तव यांना बुधवारी सकाळी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धक्का बसला. यावेळी ते ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना अचानक छातीत वेदना जाणवल्या. यानंतर राजू यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, facebook
राजू श्रीवास्तव यांना कॉमेडियन म्हणून ओळख एका टिव्ही शोमधून प्राप्त झाली आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात त्यांच्या विनोदी टायमिंगचं चांगलंच कौतुक झालं. यानंतर राजू यांनी कॉमेडी सर्कस, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमध्येही सहभाग नोंदवला.
राजू श्रीवास्तव हे एक कॉमेडियन आहेतच, पण त्यासोबतच ते आपल्या अभिनयासाठीही ओळखले जात. त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

फोटो स्रोत, facebook
त्यामध्ये सलमान खानसोबत मैंने प्यार किया, शाहरुख खानसोबत बाजीगर या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय बॉम्बे टू गोवा, आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपय्या यांसारख्या विनोदी चित्रपटांमध्येही राजू श्रीवास्तव यांनी भूमिका केल्या.
बिग बॉस या रिअलिटी शोच्या तिसऱ्या हंगामात राजू सहभागी झाले होते. यासोबतच शक्तिमान या टीव्ही मालिकेतही राजू श्रीवास्तव यांनी भूमिका केलेली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























