BBC Marathi : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख, खास तुमच्यासाठी..

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख खास तुमच्यासाठी..
1. रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट प्रकरणी शिक्षा होऊ शकते का?
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आलाय. पण याच फोटोंमुळे रणवीर सिंग आता अडचणीत आला आहे. अश्लीलता पसरवल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही न्यूड फोटो शेअर केले.
हे फोटोशूट त्याने 'पेपर' या अमेरिकन मासिकासाठी केलं होतं. रणवीर सिंगचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांनी त्यावर वेगवेगळ्या तऱ्हेच्या कमेंटस केल्या.
बॉलीवूड स्टार्सवर गुन्हे नोंद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. पण कोणतंही काम किंवा साहित्य अश्लीलतेच्या कक्षेत कधी येतं? भारतातील कायदा याबाबत काय सांगतो? हे तुम्ही इथं नक्की जाणून घेऊ शकता.
2. 5G मुळे कॉल ड्रॉप कमी होतील? तुमचं फोन बिल कमी होईल?
भारतात 5जी चा लिलाव 26 जुलैपासून सुरू झालाय. देशातल्या चार कंपन्या या लिलावात भाग घेतील. या शर्यतीत सगळ्यांत आघाडीवर रिलायन्स जिओ दिसतंय. या कंपनीने दूरसंचार विभागाकडे 14 हजार कोटी रुपये जमा केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भारती एअरटेल ने 5500 कोटी, तर अदानी समुहाने 100 कोटी रुपये जमा केले आहेत. वोडाफोन आयडियाने 2200 कोटी रुपये जमा केले आहेत. अदानी समुहाने स्पष्ट केलं आहे की, त्यांना टेलिकॉम सेक्टरमध्ये यायचं नाही तरीही 5जी मुळे त्यांच्या कामात सुसूत्रता येईल.
3. भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढतीये, कारण...
गृह मंत्रालयाने 2021 मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार 1,63,370 लोकांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला.
संसदेत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलंय की, या लोकांनी त्यांच्या 'वैयक्तिक कारणांमुळे' नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या दोन वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2020 साली 85,256 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं होतं तर 2019 साली 1,44,017 लोकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला होता.
गेल्या पाच वर्षांत जवळपास 8 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय आपले नागरिकत्व का सोडत आहेत?
4. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ला सुरुवात, भारताला विजयाची सोनेरी संधी का मानली जातेय?
2013 ला चेन्नईत झालेली बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर लिडिंग न्यूज बनली होती. त्यानंतर तब्बल एक दशकाचा कालावधी लोटलाय. 2013 मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतात दुसरी मोठी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान चेन्नईजवळ असलेल्या ममल्लापुरम शहरात चेस ऑलम्पियाड स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेत 180 हून अधिक देशांतील स्पर्धक सहभागी झाले आहेत. भारताला या स्पर्धेत किती संधी आहे?
5. आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडवरून पुन्हा वाद का पेटला आहे?
मुंबईच्या आरे कॉलनीतलं जंगल आणि तिथे प्रस्तावित असलेली मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड पुन्हा एकदा चर्चेत आहेत. नेमका आरे मधल्या कारेशडचा वाद काय आहे आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे, जाणून घेऊयात.

फोटो स्रोत, Hindustan times
जवळपास आठ वर्षांपासून कारशेडच्या मुद्द्यावरून आरेमध्ये आंदोलन सुरू आहे. ही कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारनं घेतला तेव्हा हा वाद मिटेल असं चित्र निर्माण झालं. पण या निर्णयानंतरही नव्या कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या. पण आरे मेट्रो कारशेडचा हा वाद पुन्हा का पेटला आहे?
या काही व्हीडिओ जे तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत -
1. वुहानमध्येच कोरोनाचा उद्रेक झाला असं शास्त्रज्ञांना का वाटतं?
2. मासिक पाळी असलेल्या 'त्या' मुलीला झाडांची रोपे लावू दिली नाहीत, कारण...
3. डॉक्टर होता होता अंशू मलिक अशी झाली भारताची कुस्तीपटू
4. जुळ्या बहिणी - एकमेकींशी शरीराने जोडलेल्या, स्वप्नही एकच
5. म्यानमारमध्ये प्रचंड हिंसाचारात हजारो लोकांचा मृत्यू, लष्कराची दडपशाही सुरूच
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)





























