You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठीने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या पाच बातम्या ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत..
या आठवड्यात बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या पाच बातम्या ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा? या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल. बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.
1. अग्निपथ योजना म्हणजे समाजाचं 'सैनिकीकरण,' बेरोजगारीवर उतारा की लष्करी खर्चात बचत?
मंगळवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्करासाठी असलेल्या 'अग्निपथ' या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत लष्करात अल्पकालीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
या योजनेनुसार भारतीय सैन्यात तरुणांची भरती फक्त चार वर्षांसाठी करण्यात येईल. नोकरीनंतर त्यांना सर्व्हिस फंड पॅकेज दिलं जाईल. त्याचं नाव अग्निवीर असेल. या अग्निवीरांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास पॅकेज देणार असल्याचं ही सरकारने सांगितलं आहे.
मागील काही वर्षांपासून लष्करातील भरती रखडली होती, त्याबाबत सरकारला प्रश्न विचारण्यात येत होते. ही विचारणा करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठ्याप्रमाणात होती.
कारण त्यांच्यासाठी सैन्यात भरती होणं हे आयुष्यातलं मोठं स्वप्न असतंच पण नोकरीचा एक महत्त्वाचा स्रोत असतो.
राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेचं वर्णन करताना, सैन्याचं आधुनिकीकरणं आणि कायापालट करणारं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
नवीन अग्निवीरांचं वय 17 ते 21 वर्ष असेल. पण सध्या तरुणांनी त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. असं का घडतंय? या लिंकवर क्लिक करा आणि सविस्तर वाचा.
2. राहुल गांधी ईडी चौकशी : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे?
सोनिया गांधी आणि राहुल गांधी या काँग्रेसच्या दोन सर्वोच्च नेत्यांना सक्तवसुली संचलनालयाचं समन्स… मग राहुल गांधी यांची सलग दोन दिवस चौकशी... आणि चौकशी दरम्यान त्यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर जमलेले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांची धरपकड...
पी चिदंबरम्, के. सी. वेणुगोपाल, पवन बन्सल, अशोक गेहलोत अशा नेत्यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि त्या प्रयत्नात प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांचे कपडेही फाटले. काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात तर पोलिसी बळ वापरण्यात आलं.
अशी ही सगळी धुमश्चक्री दिल्लीत 13 जूनला सुरू होती... आणि प्रकरण होतं ते नॅशनल हेराल्डचं. पण हे प्रकरण नेमकं काय आहे? हा गोंधळ इतका का उडालाय? लिंकवर क्लिक करून समजून घेऊया.
3. बिटकॉईन : सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सीला घरघर लागली, कारण...
सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉईनला गेल्या 24 तासांत मोठी घरघर लागली आहे.
बिटकॉईनचं मूल्य गेल्या 24 तासांत प्रचंड गडगडलं असून यामुळे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.
तुम्ही जर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करत असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की, क्रिप्टो बाजारात कशा प्रकारे गोंधळ माजला आहे. पण सर्वात हे नेमकं कशामुळे घडलं. लिंकवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी..
4. 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकविजेता नीरज चोप्राने फिनलँडमध्ये सुरू असलेल्या पावो नूरमी गेम्समध्ये राष्ट्रीय विक्रम रचला.
या स्पर्धेतला एकमेव भारतीय स्पर्धक असलेल्या नीरजने 89.30 मीटर दूर भाला फेकत रौप्यपदकाची कमाई केली.
नीरजने स्वत:चाच विक्रम मोडत नव्या विक्रमावर नाव कोरलं. याआधी पतियाळा 88.07 मीटर अंतरावर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम रचला होता. समजून घ्या नीरज चोप्राने नेमका काय पराक्रम केला.
5. रणबीर कपूर-आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र'ची तुलना हॉलीवूडच्या अॅव्हेंजर्ससोबत का होत आहे?
'यह कहानी है सारे अस्त्रों के देवता की- ब्रह्मास्त्र की और एक ऐसे नौजवान की जो इस बात से अनजान है के वो ब्रह्मास्त्र की किस्मत का सिकंदर है'
अमिताभ बच्चन यांच्या भारदास्त आवाजात आपल्या कथेच्या हिरोची ओळख करून देत बहुचर्चित ब्रह्मास्त्रचा ट्रेलर बुधवारी (15 जून) रिलीज झाला.
दरम्यान, या चित्रपटाच्या ट्रेलरवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. बहुतांश नेटकरी ब्रह्मास्त्र चित्रपटाची तुलना हॉलीवूडच्या मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्ससोबत करताना दिसत आहेत. लिंकवर क्लिक करा आणि वाचा ही तुलना का होत आहे?
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)