भारताच्या अग्नी-4 क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात 'हे' देश

अग्नी क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, DRDO

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारताने अग्नी-4 या मध्यम पल्ल्याच्या आणि 4 हजार किलोमीटर मारक क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 6 जूनला यशस्वी चाचणी केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ही संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आली.

अग्नी-4 ची ही चाचणी भारताच्या एसएफसी म्हणजेच स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने केलीय. एसएफसी भारताच्या अण्वस्त्रांसह बॅलेस्टिक मिसाईल्सचं व्यवस्थापन पाहतं. यापूर्वी त्यांनी 10 नोव्हेंबर 2015 ला अग्नी-4 ची चाचणी केली होती.

चाचणी यशस्वी झाल्यानंतर क्षेपणास्त्राचे सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स आणि डीफेन्स सिस्टम योग्य काम करत असल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

अग्नी-4 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 4000 किलोमीटरपर्यंतची आहे. या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचं एकूण वजन 17 टन आहे. तर त्याची एकूण लांबी 20 मीटर इतकी आहे. अग्नी-4 हे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून ते 900 किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकतं.

अग्नी-4 क्षेपणास्त्र वैशिष्ट्य

प्रकार- आंतरखंडीय

पल्ला- 4000 किलोमीटर

लांबी- 20 मीटर

वजन- 17 टन

अण्वस्त्र सज्ज - अण्वस्त्र वाहून नेतं

भरारी- 900 किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकतं.

अग्नी क्षेपणास्त्र

फोटो स्रोत, DRDO

अग्नि-4 क्षेपणास्त्राच्या मारक टप्प्यात पाकिस्तान आणि चीन ही शेजारील राष्ट्र येतात. ही राष्ट्र भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने त्यांना उत्तर देण्याची क्षमता भारतात असल्याची चर्चा सध्या देशभरात होतेय.

अग्नि-4 प्रमाणेच भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या ताफ्यात 350 किलोमीटर मारक क्षमतेचं पृथ्वी, 2700 किलोमीटर मारक क्षमतेचं अग्नी,1200 किलोमीटर मारक क्षमतेचं अग्नी-2 तर 3000 किलोमीटर मारक क्षमतेचं अग्नी-3 आणि 5000 किलोमीटर मारक क्षमतेच्या अग्नि-5 या क्षेपणास्त्राची निर्मिती अंतिम टप्प्यांत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)