या आठवड्यात बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या पाच बातम्या ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

या आठवड्यात बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेल्या पाच बातम्या ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल. बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.

1. IPL 2022: गुजरात टायटन्सच्या आयपीएल विजेतेपदाची 5 कारणं

दुखापतींमुळे खेळू शकण्याबाबत साशंकता असलेला कर्णधार आणि देशी वळणाचा प्रशिक्षक यामुळे गुजरात टायटन्स संघाचं नाव जेतेपदाचे दावेदार वगैरे शर्यतीत नव्हतं.

मोठं नाव नसलेला खेळाडू नसल्याने हा संघ कसा जिंकणार अशी थट्टाही सोशल मीडियावर उडवण्यात आली. पण गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात थेट जेतेपदावर नाव कोरलं. काय आहेत त्यांच्या विजयाची कारणं?

2. UPSC मध्ये देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या श्रुती शर्माने दिलेल्या टीप्स

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर झाले. या परीक्षेत दिल्लीच्या श्रुती शर्माने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

त्यांना हे यश कसं मिळालं यासाठी खास टीप्स तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता.

3. अर्थव्यवस्थेतील बनावट नोटांचं प्रमाण दुप्पट, मग नोटबंदी फसली का?

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षं 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या पाचशे आणि दोन हजार या दोन मोठ्या मूल्याच्या नोटा चलनात आहेत.

आणि पाचशेच्या बनावट नोटांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 101.9 टक्क्यांची (म्हणजे दुपटीने) तर दोन हजारांच्या नोटांमध्ये 54.16 टक्क्यांची वाढ झाली आहे. मग याचा अर्थ 2016 मध्ये केलेल्या नोटबंदीचं एक महत्त्वाचं उद्दिष्टं फसलं का?

4. कुराण हातात घेऊन शपथ घेणारी ऑस्ट्रेलियाची पहिली मुस्लीम मंत्री

ऑस्ट्रेलियाच्या नवीन सरकारमध्ये 23 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात दहा महिला आहे.

युवकमंत्री असलेल्या अॅनी अली आणि एड हुसक ऑस्ट्रेलियातले पहिले मुस्लीम मंत्री ठरले आहेत. हातात कुराण घेऊन शपथ घेणाऱ्या अॅनी एली या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला मंत्री आहेत.

5. जॉनी डेपने एंबर हर्ड विरोधातला खटला जिंकला, नुकसान भरपाई म्हणून मिळणार 116 कोटी रुपये

हॉलीवुड अभिनेता जॉनी डेपने त्याची पूर्व पत्नी एंबर हर्डविरोधातील खटला जिंकला आहे. एंबर हर्डविरोधात त्याने मानहानीचा खटला दाखल केला होता.

एंबर हर्डने जॉनी डेपवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते त्यात तथ्य नसल्याचं ज्युरींना आढळून आलं आहे.

या आठवड्यात बीबीसी मराठीने प्रसिद्ध केलेले हे 5 व्हीडिओ तुम्ही पाहिले आहेत का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)