'असानी' चक्रीवादळासोबत वाहून आलेल्या सोनेरी रथाचं गूढ काय?

रथ

फोटो स्रोत, Ani

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

वादळ आलं की वादळी गोष्टीही होतात. आंध्र प्रदेशमध्ये नुकतीच अशी घटना घडली आहे.

सध्या असानी नावाचं वादळ आंध्रच्या किनारपट्टीवर घोंघावत आहे. या वादळाच्या पाण्याबरोबर एक सोनेरी रथ समुद्रकिनाऱ्यावर वाहून आला आहे.

स्थानिक लोक याला 'राजा मंदिरम' म्हणत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील मच्छिमारांनी सर्वात आधी हा रथ पाहिला.

हा रथ पाहिल्यावर वादळी लाटा येत असूनही लोक तो रथ ओढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या व्हीडिओत ही दृश्यं दिसत आहेत.

त्यांच्या मदतीने स्थानिक मरीन पोलिसांनी या रथाला किनाऱ्यावर ओढलं. मरीन पोलिसांच्या मते त्यावरची अक्षरं म्यानमारच्या भाषेतील असावी.

हा रथ मरीन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो कुठून आला याचा तपास सुरू आहे. गुप्तचर विभागालाही या रथाची माहिती देण्यात आली आहे.

हा रथ पहायला आजूबाजूच्या लोकांची गर्दी जमली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

श्रीकाकुलम येथील नौपाड्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितलं की त्यांनी या संबंधी गुप्तचर विभागाला ही माहिती दिली आहे. फर्स्टपोस्टने दिलेल्या माहितीनुसार, हा रथ दुसऱ्या देशातून आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. इंटरनेटवरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एका सोशल मीडिया युझर ने रॉकी भाई का सोना वापस आ गया है अशी कमेंट केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तर हा एक घातपाताचा प्रकारही असू शकतो अशी चिंता काही जणांनी व्यक्त केली आहे. 26/11 च्या हल्ल्यातून आपण काहीच शिकलो नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)