उष्णतेची लाट: 'इतक्या वर्षांत मला कधी एवढे खराब झालेले मासे मिळाले नव्हते'

भारतभरात उष्णतेची लाट पसरत असताना देशातील गरीब नागरिक पुन्हा एकदा सर्वात असुरक्षित आहेत. बीबीसीच्या प्रतिनिधी आयुषी शाह यांचा मुंबईमधून रिपोर्ट.
सुलोचना येवले, भाजी विक्रेत्या
त्यांच्या भाजीपाल्यावर पाणी शिंपडतात. काही लिंबू आणि पालक जे त्यांनी घाऊक बाजारातून विकत घेतले होते, ते कोरडे होऊ नयेत म्हणून. पण त्यामुळे काहीही मदत होताना दिसत नाही.
अति उष्णतेमुळे त्यातील काही भाज्या खराब झाल्या आहेत, त्यामुळे त्या विकण्यायोग्य राहिल्या नाहीत.
गेल्या अनेक दशकांपासून त्याच ठिकाणी भाजीपाला विकत असल्या तर येवले म्हणतात की तिने पहिल्यांदाच इतके 70 रुपयांचे उत्पादन गमावले आहेत. ज्याचे दैनंदिन उत्पन्न 800 रुपये आहे अशा व्यक्तीसाठी हि एक महत्त्वपूर्ण रक्कम आहे.
तिची विधवा सून आणि नातवंडे यांचा समावेश असलेले कुटुंब त्या स्टॉलवर अवलंबून आहे. फायदा कमी झाल्यामुळे सुलोचना यांना भविष्याची काळजी वाटते.
"मला असहाय वाटते," त्या अश्रूभरल्या डोळ्यांनी सांगतात.

उष्णतेच्या क्रूर लाटेने भारतातील लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. 100 वर्षांतील सर्वोच्च तापमानाचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहेत.
रेकॉर्डब्रेक तापमानाच्या आठवड्यांनंतर देशाच्या हवामान खात्याने वायव्य भारतातील तापमानात काहीसा चांगला बदल होण्याची अपेक्षा केली आहे. कारण या आठवड्यात कमाल तापमान 3-4C ने घसरण्याची अपेक्षा आहे. परंतु काही दिवसांनंतर कमाल तापमान 2-3C ने वाढून थोड्या काळासाठी आराम अपेक्षित आहे.
येवले यांच्यासारखे भारतातील गरीब लोक यांच्यामध्ये अडकले आहेत. जे अशा तीव्र हवामान बदलाच्या घटनांचा आर्थिक फटका सहन करतात. मर्यादित उत्पन्न आणि उष्णतेशी जुळवून घेण्याचे अपुरे साधन यामुळे ते आता जगण्यासाठी धडपडत आहेत.
प्रमिला वालीकर, मासे विक्रेत्या
चेहऱ्याचा घाम पुसता पुसता सांगतात,की कडक उन्हामुळे मासे ताजे ठेवणं फारसं जमत नाही.
त्या सांगतात, "मी जे काही कमावते त्यापैकी बहुतेक खर्च फक्त या माशांना टिकवून ठेवण्यासाठी बर्फावर करते. एवढ्या दशकांच्या विक्रीत मला कधीच इतके खराब झालेले मासे मिळाले नव्हते. आजकाल कधी कधी दिवसाला 2,000 रुपयांचे उत्पन्न गमवावे लागत आहे."
दुसरीकडे बर्फाच्या किमतीही वाढल्या आहेत. अशा दुहेरी संकटाशी जुळवून घेण्यासाठी त्या धडपडत आहे.
"मच्छिमार समुदायाला वाढत्या तापमान आणि दीर्घ उन्हाळ्याशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी सरकारने उपकरणे आणि बर्फ पुरवणे आवश्यक आहे," असे ती म्हणते.

या दोन महिलांच्या व्यथा संपूर्ण देशभरातील असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या लाखो महिलांचं प्रतिनिधीत्व करतात. ज्यांना अशा प्रचंड उष्म्यामध्ये देखील घराबाहेर पडून काम करण्याशिवाय पर्याय नाही.
परंतु उष्णतेच्या लाटा पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे बांधकाम आणि शेती यासारखी कामे दिवसाच्या सर्वात उष्ण वेळेत धोकादायक असतील, असे तज्ञांना वाटते वाटते.
ही केवळ सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेची बाब नाही तर त्याचबरोबर भारतासारख्या मजुरांवर अवलंबून असलेल्या देशासाठी ही गंभीर आर्थिक समस्या देखील आहे. नेचर कम्युनिकेशन्सच्या अहवालानुसार उष्णतेमुळे जगात सर्वाधिक 101 अब्ज डॉलरचे नुकसान भारतामध्ये झाले आहे.
2020 च्या मॅकिन्से अहवालानुसार वाढत्या उष्णता आणि आर्द्रतेमुळे गमावलेल्या कामाच्या तासामुळे 2030 पर्यंत जीडीपीच्या अंदाजे 2.5 ते 4.5% आणि 250 अब्ज डॉलर धोक्यात येऊ शकतात. एका दशकभरापूर्वीच्या तुलनेत दिवसाच्या प्रकाशाच्या तासांपैकी ज्या दरम्यान घराबाहेरील काम असुरक्षित आहे, यामध्येही 2030 पर्यंत अंदाजे 15% वाढ होईल असेही या अहवालात म्हटले आहे.
पांडुरंग गिर्हे, वय 76
दिवसातील सर्वांत उष्णतेच्या वेळी त्याच्या हातगाडी पुलावरून चढावर ओढत चालले आहेत. या हातगाडीमध्ये 60 किलो वजन आहे. तीव्र उष्णतेमुळे ते अजून जड वाटत आहे. फक्त 200 रुपयांमध्ये हे करणे कठीण आहे, परंतु त्याचे गुडघे दुखत असूनही त्यांच्याकडे या कामाला पर्याय नाही.
या वर्षी भारतात आलेली उष्णतेची लाट तीव्र होती, परंतु तज्ञांच्या मते ही वेगळी घटना नाही. ते म्हणतात की, वाढत्या तापमानामुळे भविष्यात अधिक सामान्य वाटू शकणार्या घटनांची ही सुरुवात आहे.

पण पांडुरंग गिर्हे यांच्या सारख्या रस्त्यावरील गरीब विक्रेत्यांना उष्णतेची लाट म्हणजे काय किंवा ती कशामुळे आली असेल हे समजत नाही. त्यांना एवढेच माहीत आहे की, त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि त्यांच्या कमाईवर याचा परिणाम होत आहे. उष्णतेची लाट असो वा नसो पण त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना हे काम करत राहिले पाहिजे.
"यंदा गरमी जरा जास्त आहे. पण मी काम केले नाही तर पोट कसे भरणार?" पांडुरंग गिर्हे खांदे उडवत उत्तर देतात.
शहरांमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. मोफत, स्वच्छ पिण्याचे पाणीही मर्यादित ठिकाणी आहे आणि अगदी काही काळासाठीही गरमीपासून वाचण्यासाठी पुरेसे निवारे नाहीत, असे तज्ज्ञ म्हणतात.
C-40 सिटीजच्या दक्षिण-पश्चिम आशियाच्या प्रादेशिक संचालक श्रुती नारायण म्हणतात की, "शहरांनी डेटा-आधारित हवामान कृती योजना विकसित करून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे."
"यामध्ये उष्णता कमी करणे आणि त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी यावरील स्पष्ट, निश्चित कृतींचा समावेश हवा. तसेच उष्मा योजनांसारख्या आम्ही आधीच अनुभवत असलेल्या घटनांसाठी लवचिकता निर्माण करणे गरजेचे आहे"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























