महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट? जाणून घ्या पुढील 7 दिवसांचा हवामान अंदाज

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

मराठवाड्यात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असून उर्वरित भागामध्ये तो कमकुवत झाला आहे. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मागील 24 तासांत काही ठिकाणी पाऊस झाला.

शनिवारी (8 ऑगस्ट) कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

कुठे कोणता अलर्ट?

जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर आणि मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे तर विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस

मागील 24 तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे पडला आहे. मागील 24 तासांत तिथे 52.6 मि.मी पाऊस पडला. त्या खालोखाल ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि परभणी येथे अनुक्रमे 36 मि.मी., 24 मि.मी. आणि 22.2 मि. मी पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमध्ये 1 जूनपासून आतापर्यंत 5050.9 मि.मी. पाऊस पडला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

रविवारी (9 ऑगस्ट) कोकण-गोवा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

अहिल्यानगरसह मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

रविवारी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तर विदर्भातील गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट देण्यात आलेल्या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. इथे सोसाट्याचा वाराही येण्याची शक्यता आहे.

उर्वरित जिल्ह्यांना वॉर्निंग देण्यात आलेली नाही. परंतु, काही ठिकाणी हलका पाऊस येऊ शकतो.

अहिल्यानगरसह सोलापूर, नांदेडमध्ये पावसाची सरासरी कमी

राज्यात अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. यामध्ये अलिबाग, रत्नागिरी, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

यात ब्रह्मपुरी येथे पावसाची सरासरी उणे 25.3 टक्के इतकी आहे. त्यानंतर अहिल्यानगर, रत्नागिरी या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

महाराष्ट्रात पुढील 7 दिवस हवामान कसे असेल?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्रात पुढील 7 दिवस पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

8 आणि 9 ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

8 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

9 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस होऊ शकतो.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज

फोटो स्रोत, IMD

10 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

मात्र या दिवसासाठी कोणताही स्वतंत्र हवामान इशारा देण्यात आलेला नाही.

11 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

12 ऑगस्ट

कोकण-गोव्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

13 ऑगस्ट

पावसाचा जोर मुख्यतः कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

14 ऑगस्ट

आठवड्याच्या अखेरीसही कोकण-गोव्यातील बहुतांश भागात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)