देवेंद्र फडणवीस - ‘उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि अमृता नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही’

फोटो स्रोत, Twitter
शिवसेना, भाजप यांच्यातलं ट्विटर वॉर, त्यात कधीतरी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांचं अवचित ट्वीट हा कायमच चर्चेचा विषय असतो.
त्यातच उद्धव ठाकरे सभेतून आणि सार्वजनिक कार्यक्रमातून अनेक टोमणे मारत असतात. त्यांच्या टोमण्यांना आणि आरोपांना अमृता फडणवीस उत्तरही देत असतात.
त्यावर प्रश्न विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आहे.
ते म्हणतात, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि अमृता नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही.
खरं म्हणजे उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे आणि असं काही झालं तर माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाहीये. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यावर मला जास्त काही बोलायचं नाही," असं ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, "मला आदित्यने सांगितलं की मनुकुमार श्रीवास्तव छान गातात. मला धक्का बसला. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात."असा टोला त्यांनी लगावला.
त्यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, "मला सुद्धा धक्का बसला होता. मला वाटलं होतं. अब्जाधीश फक्त आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे. अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात."
गेल्या रविवारी एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलतानाही अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर असलेल्या वावराविषयीची भूमिका स्पष्ट केली होती.
तेव्हा त्या म्हणाल्या, "मी जे ट्विट डिलीट केलेत ते देवेंद्रच्या सांगण्यावरून केलेत. नाहीतर मी कोणाच्या बापालाही भीत नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























