You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनोज पांडे यांनी स्वीकारला लष्करप्रमुखपदाचा कार्यभार
मनोज पांडे यांनी लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मनोज नरवणे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती लष्करप्रमुख झाली आहे.
मूळचे नागपूरकर असलेल्या पांडे यांनी 1982 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम केलं. ते इंजिनिअरिंग विभागात होते. या विभागातून लष्करप्रमुख होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ऑपरेशन पराक्रम मध्ये भाग घेतला होता. वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड , ईशान्यकडेली कॉर्प्सचं नेतृत्व केलं आहे. इस्टर्न कमांडचा कारभार सांभाळण्यापूर्वी ते अंदमान निकोबार कमांडच्या कमांडर इन चीफ ची जबाबदारी सांभाळी होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची लष्करप्रमुख म्हणून घोषणा झाली आणि आज त्यांन कार्यभार सांभाळला. लष्करप्रमुख पदाची निवड प्रक्रिया दोन ते तीन महिने चालते. ते संरक्षण मंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतात. राष्ट्रपतींनाही ते वेळोवेळी सल्ला देत असतात.
लष्करप्रमुखांच्या निवड समितीत पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री असतात. या पदावर निवड होणारी व्यक्ती लष्करातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असते.
जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतप चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पदही आता रिक्त आहे.
मनोज पांडे चौथे मराठी लष्करप्रमुख आहेत. याआधी गोपाळ बेवूर, अरुणकुमार वैद्य यांनी या सर्वोच्च पदावर काम केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)