You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना :'माझ्या वडिलांचा मृतदेह पिशवीत गोठवलेल्या भाजीसारखा भासत होता'
गेल्यावर्षी उन्हाळ्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो भारतीयांचा मृत्यू झाला. या लाटेच्या तडाख्यात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. पत्रकार बरखा दत्त कोरोना साथीच्या आजाराबाबत वार्तांकन करत होत्या तेव्हा म्हणजेच एप्रिल 2021 मध्ये त्यांनी या लाटेत आपल्या वडिलांना गमावलं. आपल्या वडिलांना गमावल्याचं दुःख ज्या प्रमाणे बरखा दत्त यांना झालं त्याच पद्धतीचं इतर मुलींचं दुःख इतर त्यांनी आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
आता एक वर्ष उलटलं पण मी संगीत ऐकलं नाही. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत माझ्या वडिलांचा मृत्यू होऊन एक वर्ष उलटलं.
काही दिवसांपूर्वी संगीताचे काही स्वर कानावर पडले... Guantanamera Guajira Guantanamera…
प्रणय, देशभक्ती, निषेध आणि बदल घडवण्यासाठी गायलं गेलेलं क्यूबन लोकसंगीत एकून माझे हात थरथर कापू लागले. माझं सर्वांग थरथरत होतं.
आठवणी त्रासदायक असू शकतात. माझ्यासाठी आणि सोबतचं माझ्या बहिणीसाठी हे गाणं आमच्या वडिलांचं गाणं होतं. हे गाणं आमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचं साक्षीदार होतं.
आम्ही लहान असताना स्क्रॅच पडलेले कॅसेट्स होते, आम्ही किशोरवयात आल्यावर आठ ट्रॅकच्या सिस्टममध्ये त्याला रिमास्टर केलं. पुढे आम्ही कॉलेजात जाऊ लागलो तेव्हा ते सीडीमध्ये आणलं आणि आता अखेर त्यांच्या डेस्कटॉपवर हे गाणं आम्ही सलग ऐकतोय.
पप्पा नेहमी त्यांची नातवंडं, कुत्रे, मेकॅनो सेट आणि वेढब दिसणार्या वायर्सच्या वेढ्यात असायचे. कधीकधी निखळ आनंद मिळावा म्हणून ते केटलचे काही भाग, स्पीकर्स, कॉफी मेकर मशीन्स आपल्या मित्रांसाठी दुरुस्त करायचे.
एसपी दत्त - मित्र आणि कुटुंबासाठी 'स्पिडी' - हे लाखो लोकांपैकी एक होते ज्यांनी कोरोना आरोग्य संकटात जेव्हा आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली तेव्हा आपला जीव गमावला. ऑक्सिजन पुरवठा अपुरा असल्याने एप्रिल महिना सर्वाधिक क्रूर ठरला. रस्त्यावरच ज्यांनी प्राण गमावले त्यांना हॉस्पिटल दाखलही करून घेत नव्हते. लसीकरणाला उशीर झाला होता. निवडणुकांची रणधुमाळी मात्र वेळापत्रकानुसार सुरू होती.
संपूर्ण व्यवस्थाच कोसळल्याने वडिलांना वाचवण्यासाठी आम्ही मुलीच एकमेकींकडे आशेने पाहत होतो.
मी मदत करू शकेन या आशेने मुंबईहून समृद्धी सक्सेना माझ्यापर्यंत पोहचल्या. त्यांना तत्काळ ऑक्सीजन सिलेंडरची आवश्यकता होती.
पटणाहून मनीषा यांनी संपर्क साधला आणि म्हणाल्या त्यांच्या 53 वर्षीय वडिलांची प्रकृती गंभीर होती कारण ते दाखल असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नव्हते.
'ऑक्सिजन, ऑक्सिजन, तुम्ही मला ऑक्सिजन मिळवून देऊ शकता?'
बंगळुरूच्या 21 वर्षीय भरिणीने मला विचारलं, "मी किती सक्षम असणं अपेक्षित आहे? तिने तिचे आई-वडील एका कार अपघातात गमावले होते. तिला दत्तक घेतलेली आई कोव्हिडची लागण झाल्यानंतर दगावली."
पत्रकार स्तुती घोष आणि मला आमचा अपराधीपणा आतून कुरतडत होता. आमचे वडील आमच्यापासून दूर जात होते. आमच्या दोघींचं दुःख समानच होतं. सोबतच अपराधीपणाची भावना होती कारण एवढ्या वाईट प्रसंगी ही इतर शेकडो हजारो भारतीयांपेक्षा आमच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली होती. ते रस्त्यावर बेवारस पडले नव्हते.
तिचे वडील वारले. काही आठवड्यांत, तिचं दुःख रागात रूपांतरित झालं, "अनेक जण मरत आहेत ते सरकारच्या गणतीत सुद्धा नाहीत हा मृतांचा अपमान आहे".
आम्ही बेवारस होतो. मुली म्हणून आणि नागरिक म्हणून सुद्धा.
माझ्या वडिलांचा मृत्यू होण्याआधी आम्ही आमची आई प्रभा दत्तचं भरभरून कौतुक केलं. मी 13 वर्षांची असताना ती ब्रेन हॅमरेजमुळे गेली. ती भारतातील पहिली महिला युद्ध वार्ताहर होती जिचा 40 व्या वर्षी मृत्यू झाला. आमच्यासाठी ती एक आख्यायिका होती.
समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणं सोपं असतं. जसे की आमचे बाबा.
कोव्हिड मध्ये मी माझ्या वडिलांना गमावलं. तेव्हा मला जाणवलं की माझे वडील माझ्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू होते.
एप्रिल 2021 मध्ये जेव्हा मला समजलं की, माझ्या वडिलांना कोव्हिडं झालाय तेव्हा मी मुंबईतील स्मशानभूमीत होते. अश्रू रोखत व्हीलचेअरवर बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीला निरोप दिला.
कोव्हिडं हेच माझं संपूर्ण आयुष्य बनलं होतं. कोव्हिडच्या पहिल्या लाटेत मी संपूर्ण भारतभर रस्तामार्गे सुमारे 30,000 किमी (18,641 मैल) पेक्षा जास्त प्रवास केला. आणि दुसऱ्या लाटेत हवाई मार्गाने आणि रस्त्याने हजारो किलोमीटरचा प्रवास केला.
मी मृत्यू आणि दाटलेल्या निराशेचा इतिहास गोळा करत होते. पण आता घरूनचं बातमी आली होती. खाजगी रुग्णवाहिकेतून वडिलांना रुग्णालयात नेण्याच्या माझा निर्णय चुकला ही गोष्ट माझी पाठ सोडत नव्हती.
त्या रुग्णवाहिकेत पॅरामेडिक्स, स्ट्रेचर नव्हता. फक्त ड्रायव्हर होता. ज्या विनाइल बेंचवर माझे वडील एखाद्या असहाय्य मुलासारखे पडून होते तिथं असलेला तो ऑक्सिजन सिलिंडरसुद्धा बिनकामी होता.
आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत त्यांची प्रकृती बिघडली होती. कारण रस्त्यात बऱ्याच पोलीस चौक्या होत्या ज्यांमुळे रुग्णवाहिकेचा वेग मंदावला होता. त्यात सिलेंडरमधून ऑक्सिजनचा हाय फ्लो होत नव्हता.
जेव्हा आम्ही त्यांचा मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीत नेला तेव्हा तिथली परिस्थिती थक्क करणारी होती. ते मृत्यु पावल्यावर आम्ही त्यांना एक खाजगी शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेले. त्या शववाहिकेचं स्ट्रेचर चमकदार तपकिरी नवीन लेदर असलेला, सीटची उंची बदल करण्यायोग्य होती. आणि तिथं माझ्या वडिलांच प्रेत एका फिकट तपकिरी पिशवीत ठेवलं होतं, जणू ते गोठवलेली भाजीच होती.
आज आपण या गोष्टी विसरण्यास प्रयत्न करतोय, दुःख विसरण्यासाठी हवालदिल झालोय. मात्र ह्या घावावर वरवरची मलमपट्टी करून हा घाव बरा होणाऱ्यातला नाही.
सामूहिक आठवणींना दुःखाची गडद छाया असते. आजही माझ्या वडिलांच्या खोलीत जायला माझं मन धजावत नाही. तिथं त्यांच्या पलंगावर छतापासून तीन गोलाकार ट्रॅक तयार केले गेले होते.
माझे वडील विज्ञानवादी होते. शाळेत पहिलं टॉय रॉकेट बनवणारे ते हुशार विद्यार्थी होते. तरुणपणी त्यांनी कॅडबरी चॉकलेट्ससाठी वेंडिंग मशीन बनवली. नंतर, त्यांनी 'स्पीडशाईन' या नावाने शू शाइन मशीन बनवली. ते विज्ञानाधारीत दृष्टिकोनातून म्हणायचे "जे बरं होऊ शकत नाही, ते सहन केलंच पाहिजे" आणि हे त्यांचं आवडतं वाक्य होतं.
जेव्हा त्यांची कोव्हिडची चाचणी पॉजिटीव्ह आली तेव्हा त्यांनी त्यांच्या आवडत्या वाक्यांचा पुनरुच्चार केला. पण ते चुकीचे ठरले.
भारताने लस लवकर आणली असती तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. लसींच्या पहिल्या डोससाठी सरकारने 10 जानेवारी 2021 रोजी पहिला आदेश काढला. हे डोस 1 करोडहून अधिक होते मात्र ते दिल्लीच्या प्रौढ लोकसंख्येला पहिला डोस देण्याइतपत ही पुरेसे नव्हते.
माझ्या वडिलांनी जे केलं ते कदाचित लाखो भारतीयांना सहन करावं लागलं नसतं.
माझ्या वडिलांना मरावं लागलं नसतं.
बरखा दत्त : पुरस्कारप्राप्त टीव्ही पत्रकार, अँकर आणि लेखिका
ह्युमन्स ऑफ कोविड: टू हेल अँड बॅक
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)