पंजाबमध्ये शिवसेना आणि शीख संघटनांमध्ये संघर्ष

पंजाबमधील पटियाला मध्ये मोर्चा काढण्यावरून शिवसेना (बाळ ठाकरे) आणि शीख संघटनांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ही
पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शीख संघटना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचे समजते.
'खलिस्तान जिंदाबाद' असा नारा शीख संघटनांनी दिला तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेकडून खलिस्तान मुर्दाबादचा नारा देण्यात आला.
शीख ऑफ जस्टिस या संघटनेला भारतात बंदी घालण्यात आली असून या संघनेटेचे गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी 29 एप्रिल रोजी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर खलिस्तानी ध्वज फडकवला जाईल अशी घोषणा केली होती.
शिवसेनेने याला विरोध करत निषेधार्त मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, "काही वेब चॅनेल्सकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या निराधार असून त्यावर विश्वास ठेऊ नका.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही ट्विट करत सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्याचं सांगितलं आहे.
ही घटना दुर्देवी आहे असं म्हणत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांशी चर्चा केली असून परिसरात आता शांततेचं वातावरण आहे असंही त्यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ते म्हणाले, "आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. राज्यात आम्ही कोणालाही अशांतता पसरवू देणार नाही. पंजाबमध्ये शांतता आणि सद्भावना सगळ्यात महत्त्वाची आहे."
विरोधकांनी मात्र यासाठी सत्ताधारी आम आदमी पक्षाला जबाबदार धरलं आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटलं, "पतियाळामध्ये जे झालं त्यासाठीही केजरीवाल केंद्र सरकारला दोष देणार? सीमेकडील भागात अराजकता आहे. राज्यात अत्यंत वाईट तुष्टीकरण झाल्याचं दिसतं. अराजकता पसरवणारे बाहेर फीरत हेत. तुमच्या राज्यातील सरकार पोलिसांचा वापर वैयक्तिक वैमनस्यासाठी करत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था स्थापन करा."
भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही आम आदमी पक्षावर टीका केली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी अरविंद केजरीवाल यांना खूष करण्याऐवजी पंजाब राज्यातील लोकांवर लक्ष केंद्रीत करायला हवं असं काँग्रेसचे नेते जयवीर शेरगील यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला असून अफवा पसरवू नये असं आवाहन केलं आहे.
दरम्यान ही शिवसेना महाराष्ट्रातलीच आहे किंवा नाही याबद्दल खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)