You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी
कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. 21 वर्षांनी कोल्हापूरला 'महाराष्ट्र केसरी'चा मान मिळाला आहे. 2001 साली विनोद चौगुले यांनी मानाची गदा मिळवली होती.
महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात सामना झाला. पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केला.
पृथ्वीराजने वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत.
त्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी अभिनंदन केलं आहे.
"महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अंतिम लढत झाली ज्यामध्ये पृथ्वीराजने विजयाची नोंद केली आहे. कुस्तीपंढरी असलेल्या कोल्हापुरातील मल्ल पृथ्वीराज पाटील यांनी यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"पृथ्वीराजच्या या यशाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे," अशा शब्दांमध्ये सतेज पाटील यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलंय की, "सातारा इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावल्याबद्दल कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील (20) याचं मनःपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेत चांगली लढत दिल्याबद्दल विशाल बनकर याचंही अभिनंदन."
पृथ्वीराज पाटील ने उफा( रशिया ) येथे जागतिक जुनियर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत 92 किलो वजनी गटात चुरशीच्या लढतीत कांस्यपदक जिंकले होते.
रशियाच्या किरील्लोवला त्याने 2-1 असे पराभूत केले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)