जितेंद्र आव्हाडांची महागाईवरून मोदी सरकारवर टीका, म्हणाले, 'अमेरिकेहून हवेने पोट भरणारं मशीन मागवा' #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. अमेरिकेहून हवेने पोट भरणारं मशीन मागवा - जितेंद्र आव्हाड

अमेरिकेत हवेने पोट भरणाऱ्या मशीनचा शोध लागला आहे. ही मशीन लवकरच भारतातही लाँच होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली तरी काळजी करू नका असा उपरोधिक टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. याविषयी बोलताना मंत्री आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते अंबरनाथमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

"अमेरिकेत सध्या हवेने पोट भरणारं मशीन विकसित झालं आहे. लवकरच ही मशीन भारतात येईल. महागाई कितीही वाढली, पेट्रोल अगदी अडीचशे-तीनशे रुपये लिटर जरी झालं तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही. हवेतून पोट भरणारं मशीन मागवा आणि निश्चिंत व्हा," असं आव्हाड यावेळी म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.

2. नवाब मलिक यांची सुटकेसाठी सुप्रीम कोर्टात धाव

आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात अटकेत असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सुटकेसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन नाकारण्यात आल्याने मलिक जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला.

नवाब मलिक

फोटो स्रोत, facebook

मंत्री नवाब मलिक यांना 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. दरम्यान, त्यांनी मुंबई हायकोर्टात मलिक यांनी जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळून लावण्यात आला होता.

या निर्णयाविरोधात मलिक यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. माझी अटक पूर्णपणे बेकायदेशील असून मला तात्काळ सोडले जावे, अशी विनंती मलिक यांनी आपल्या अर्जात केली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

3. एक संधी द्या, भ्रष्टाचार कसा संपवायचा महा माहितीये - केजरीवाल

मी गुजरात जिंकायला आलोय, भ्रष्टाचार कसं संपवायचा मला चांगलंच माहिती आहे. मला फक्त एक संधी द्या, असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या जनतेला केलं आहे.

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, facebook

गुजरात येथे शनिवारी (2 एप्रिल) आयोजित रोड शोनंतर ते बोलत होते.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यावेळी ते म्हणाले, "राजकारण कसं करायचं ते मला माहीत नाही. पण भ्रष्टाचार कसा संपवायचा ते मला चांगलंच माहिती आहे. आम्ही दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला. सध्या तुम्ही दिल्लीतील कोणत्याही कार्यालयात गेलात तरी तिथे तुम्हाला लाच देण्याची गरज पडणार नाही. पंजाबात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दहा दिवसांत भ्रष्टाचार संपवला आहे. तर मग गुजरातमध्ये काय होईल?

ही बातमी ई-सकाळने दिली.

4. देशाचं राजकारण वेगळ्या दिशेने जातंय - शरद पवार

कर्नाटकात काही समाजकंटकांनी अल्पसंख्याकांच्या दुकानातून खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशाचं राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याची नाराजी पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

सांगली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "कर्नाटकात भाजपाचं राज्य आहे. तिथे अल्पसंख्याक समुदायातील लोकांच्या दुकानातून साहित्य घेऊ नका, असा फतवा काही संघटनांनी काढला आहे. व्यवसाय कुणीही करू शकतो. व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे."

अल्पसंख्याक जातीचा आहे म्हणून त्याचा मालच घेऊन नका, अशा प्रकारची कटुता राज्य हातात असणारे घटक करायले लागले, तर सामाजिक ऐक्य कसं ठेवायचं, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. ही बातमी लोकसत्ताने दिली.

5. मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात दरेकर यांना नोटीस

मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात मुंबई पोलीस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी यासंदर्भात दरेकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्यांना सोमवारी (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्या आदेश देण्यात आले आहेत.

मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. ही बातमी एबीपी माझाने दिली.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)