You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिल्पा शेट्टीला रिचर्ड गेअरनं घेतलेल्या 'त्या' चुंबन प्रकरणी कोर्टाचा दिलासा
प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला हॉलिवूड स्टार रिचर्ड गेअर यानं एका कार्यक्रमात सर्वांसमोर किस केलं होतं.
या प्रकरणी एका भारतीय न्यायालयानं 15 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीची अश्लिललेच्या आरोपांतून मुक्तता केली आहे.
2007 मध्ये या हॉलिवूड स्टारनं दिल्ली येथील एड्सबाबतच्या जनजागृतीच्या एका कार्यक्रमात शिल्पा शेट्टी हिला गालावर किस केलं होतं, असं फुटेजमध्ये पाहायला मिळतं.
शिल्पा शेट्टी यांच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं म्हणत कोर्टानं ते फेटाळून लावले आहेत. तसंच शिल्पा विनाकारणच्या आगाऊपणाच्या बळी ठरल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे.
हा प्रकार घडला त्यावेळी काही कट्टर हिंदुत्ववादी गटांनी हा भारतीय मूल्यांचा अपमान असल्याचं म्हणत, याविरोधात आंदोलनही केलं होतं.
भारतामध्ये अशाप्रकारे सार्वजनिकरित्या चुंबन घेणं हे काही जणांच्या मते निषिद्ध मानलं जातं.
रिचर्ड गेअर यांनी जवळपास 15 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या एका चॅरिटी सोहळ्यामध्ये शिल्पा शेट्टीला सर्वांसमोर स्टेजवर मिठी मारली होती तसंच चुंबन घेतलं होतं. नंतर त्यांनी या प्रकारासाठी माफीही मागितली होती.
चुंबन घेणं ही सुरक्षित प्रक्रिया असून त्यामुळं एचआयव्ही संसर्ग पसरण्याचा धोका नसतो हे दाखवण्याचा आपला प्रयत्न होता, असं त्यांनी म्हटलं होतं.
त्यावेळी या प्रकरणासाठी रिचर्ड गेअर यांच्या विरोधात अटक वॉरंटही जारी झालं होतं, ते सुप्रीम कोर्टानं नंतर लगेच रद्ददेखील केलं होतं. हा प्रकार संबंधितांनं केवळ प्रसिद्धीसाठी केला असल्याचा दावा या प्रकरणातून फेटाळण्यात आला होता.
पण याच प्रकरणी शिल्पा शेट्टीवर लागलेले आरोप हे गेल्या आठवड्यात मुंबईतील एका न्यायालयाने फेटाळले आहेत. 15 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं.
हा प्रकार घडला तेव्हा त्याचा पुरेसा विरोध किंवा निषेध केला नाही म्हणून, शिल्पा शेट्टी यांना आरोपी समजणं हे चुकीचं असल्याचा युक्तीवाद त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केला.
2007 मध्ये युके रिअॅलिटी टिव्ही शो बिग ब्रदरमध्ये झळकल्यानंतर शिल्पा शेट्टी भारतासह विदेशातही प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या शोमध्ये तिला वर्णद्वेषी प्रतिक्रिया आणि अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ती या शोची विजेती ठरली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)