बिरजू महाराज यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बिरजू महाराज

फोटो स्रोत, PREETI MANN

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

प्रसिद्ध कत्थक नर्तक बिरजू महाराज यांचं रविवारी (16 जानेवारी) रात्री उशीरा निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त बिरजू महाराज यांच्या निधनाचं वृत्त त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी फेसबुक पोस्ट लिहून दिलं आहे.

बिरजू महाराज यांचा जन्म लखनऊमधल्या प्रसिद्ध घराण्यात झाला होता. त्यांचे वडील अच्छन महाराज आणि काका शंभू महाराज देशातल्या प्रसिद्ध कथक कलाकारांपैकी एक होते.

बिरजू महाराज यांचं खरं नाव बृजमोहन मिश्रा होतं. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या नवव्या वर्षीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या काकांकडून कथक शिकायला सुरुवात केली.

काळी काळानंतर कपिला वात्स्यायन त्यांना दिल्लीला घेऊन गेल्या. तिथं त्यांनी संगीत भारती संस्थेत लहान मुलांना कथक शिकवायला सुरुवात केली. दिल्लीत काहीकाळ त्यांनी कथक केंद्राचा कार्यभार सुद्धा सांभाळला.

त्यांनी कथकचे अनेक प्रयोग केले. काही सिनेमांसाठी त्यांनी कोरिओग्राफीसुद्धा केली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बिरजू महाराज यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कला क्षेत्रातल्या अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

गायक अदनान सामीने ट्वीट करत म्हटलं की, महान कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनामुळे मी अतिशय दुःखी झालोय. आपण कला क्षेत्रातील एक संस्थाच गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेनं अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे.

बिरजू महाराज यांचं नाव आधी दुखहरण असं ठेवण्यात आलं होतं. ज्या रुग्णालयात त्यांचा जन्म झाला, त्या रुग्णालयात त्यादिवशी त्यांच्याशिवाय सर्व मुलीच जन्माला आल्या होत्या. त्यामुळे त्यांचं नाव ब्रिजमोहन ठेवण्यात आलं. पुढे जाऊन हे नाव बिरजू आणि नंतर बिरजू महाराज म्हणून प्रसिद्ध झालं.

बिरजू महाराज

फोटो स्रोत, PREETI MANN

बिरजू महाराजांना कथक नृत्याचा वारसा मिळाला होता. त्यांचे पूर्वज अलाहबादमधल्या हंडिया तालुक्यातील होते. इथे 1800 पासून कथक कलाकारांची 989 कुटुंब राहात होते. आजही या ठिकाणी कथकांचा तलाव आणि सती चौथरा आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)